ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात क्रूझर वाहन सफारी; मान. मंत्री वने  सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नवीन उपक्रमांचा शुभारंभ

0
694

मोहम्मद सुलेमान बेग ; ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रात जिप्सी आणि कॅन्टर वाहनांच्या सहाय्याने पर्यटक सफारीचं आनंद घेत आहेत. जंगल सफारी दरम्यान कोअर क्षेत्रातील विविध पर्यटन मार्गांमध्ये एकेरी आणि छोटे असल्यामुळे अनेकदा अडचणे उत्पन्न होतात, आणि त्याचं कारण कॅन्टर वाहनांचं आवाज इतर पर्यटकांसाठी किंचित असुवाध पुरवतं.
त्या सोबतच कॅन्टर वाहन जिप्सीच्या मध्ये आल्याने इतर पर्यटकांना उच्च दर्जाचा पर्यटन अनुभवायचं आणि त्यामुळे वंचीत राहावं लागतं. कॅन्टर द्वारे सफारी करणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार पर्यटनाचं अनुभव देऊन कॅन्टर वाहनांना नऊ सीटें असलेल्या क्रुझर पर्यटन वाहन सुरु करण्याचं निर्णय मान.सुधीर मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी मांडली होती.

सदर वाहन पर्यटकांचे सेवेत रुजू करण्याकरिता आज दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी नियोजन भवन चंद्रपूर येथे लोकार्पण सोहळा मान. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे शुभ हस्ते करण्यात आले. याकरीता जिल्हा वार्षिक योजना (2022-23) नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत क्रुझर वाहन खरेदी करण्यासाठी रु. 92.79 लक्ष निधी जिल्हाधीकारी, चंद्रपुर यांचे कडुन प्राप्त झाली आहे.
सदर वाहनात जंगल सफारीच्या दृष्टीने आवश्यक बदल करण्यात आलेले आहे व तसेच हे वाहन मोहर्ली गेट वरून पर्यटकांसाठी नियमित उपलब्ध राहतील व या वाहनाची बुकिंग व्यवस्था पूर्वी प्रमाणे बुकिंग मशीन द्वारे क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयात उपलब्ध राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here