आधीच प्रदुषित असलेल्या चंद्रपुर मध्ये हिवाळ्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे ,परंतु ऑक्टोबर पेक्षा नोव्हेंबर मध्ये येथे प्रदूषनात पुन्हा वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.विशेष म्हणजे सुक्ष्म धूलिकनाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे. नोव्हेंबर च्या महिन्याच्या एकूण 30 दिवसापैकीं चंद्रपुर चे 30 दिवस प्रदुषित होते.
● 0-50 चांगला आणि 51-100 समाधान कारक असा निर्देशांक असलेला एकही दिवस नव्हता. ●100-200 Moderate निर्देशांक असलेले 19 दिवस प्रदूषित होते
● 201-300 (Poor) निर्देशांक असलेले 11 दिवस अतिशय जास्त प्रदूषण आढळले.
●समाधानाची बाब म्हणजे विदर्भात अनेक ठिकाणी आढळलेले अतिशय धोकादायक प्रदूषण येथे आढळले नाही अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यानी दिली.
*प्रदूषण निर्देशांक कसा ठरवला जातो*
● 0-50 AQI (Good) निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो.
●51-100 AQI ( Satisfactory) निर्देशांक हा समाधानकारक प्रदूषण मानले जाते.
●101-200 AQI ( Moderate) निर्देशांक सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत येतो.
●201-300 AQI (Poor) निर्देशांक असून जास्त प्रदुषित मानला जातो.
●301-400 AQI(Very Poor) निर्देशांक हा अति प्रदूषित मनाला जातो-
●401-500 AQI (Severe)निर्देशांक हे धोकादायक प्रदूषण मानले जाते.
हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीत कमी 3 तर जास्तीत जास्त 8 प्रदुषकाना प्रमाण मानले जाते. त्यात धूलिकण,2.5,10. ओझोन,कार्बन मोनोकसाईड, सल्फर डाय ओकसाईड, नायट्रोजन डाय ओकसाईड, अमोनिया, लीड ह्या
प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो.
प्रदूषनाची कारणे
वाहनांची वाढती संख्या ,त्यातून निघनारा धूर ,धूळ , रस्त्यावरील धूळ,कचरा ज्वलन ,बांधकाम आणि स्थानिक उद्योग ,इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषनात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक शहरात अलीकडे विकासासाठी विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू असते त्यातच वाहनाच्या संख्येत वाढ होत आहे.त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते.बहुतेक शहरात सुद्धा अश्याच समस्या निर्माण होत असल्याने प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.
प्रदूषणामुळे रोगराईत वाढ
हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते.थंडी मुळे आणि संथ वाऱ्या मुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात.पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चागला मानला जात असे परंतु अलीकडे प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. प्रदूषणामुळे आधिच श्वसनाच्या रोग् असणाऱ्या ना हानिकारक असते ,तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात.दमा, ब्रॉकाय टिस, टीबी,हृदय रोग आणि मानसिक रोग वाढतात,
प्रदूषण नियंत्रण कसे होणार
अलीकडे औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक प्रदूषण असले तरी महाराष्ट्रात सर्वच जील्ह्यात प्रदूषण वाढले आहे.वाढती वाहने,धुळीचे रस्ते, कचरा ज्वलन,कोळसा ज्वलन आणि शहरातील व्यावसाईक प्रतिष्ठाण कारणीभूत असतात.
हे प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे,शहरात सायकल चा उपयोग वाढविणे, वाहनांच्या संख्येत घट करणे,कचरा न इळणे ,उदयोगांणी प्रदूषण रोखणे , नागरिकांनी सुद्धा प्रदूषण होऊ नये अश्या उपाययोजना करणे ,प्रशासनाणे कडक अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या तरच प्रदूषनावर नियंत्रण होऊ शकेल.
प्रा सुरेश चोपणे
पर्यावरण अभ्यासक
9822364473