सिंदेवाही :
तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाही बीटातील आवळगाव येथे गावालगत असलेल्या शेतामध्ये काम सुरू असताना एक लांब मोठा अजगर साप शेतमजुरांना दिसला. याची सूचना त्यांनी ‘स्वाब नेचर केअर’ संस्थेच्या सर्पमित्रांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्र यश कायरकर व वेद प्रकाश मेश्राम यांनी मोक्याचा स्थळी जाऊन त्या 10 फुट लांबीच्या व 15 किलो वजनी अजगर सापाला सुरक्षित रेस्क्यू केला.
यावेळी त्यांनी उपस्थित शेतमजुरांना व शेतकऱ्यांना अजगर सापाबद्दल सांगताना बिनविषारी अजगर आणि विषारी घोणस यांच्यामधील फरक समजून सांगितला. “कारण घोणस प्रमाणेच अजगर ही थोड्या फार प्रमाणात सारखे दिसत असल्यामुळे बहुतांश लोक त्याला विषारी घोणस समजून मारून टाकतात. असे करू नये अजगर हा संरक्षित प्राणी असून तो ‘शेड्युल वन’ मध्ये येत असल्याने त्याला वाचवणे गरजेचे आहे आणि अजगर हा माणसांना गिळून टाकतो अशा अफवा आहेत मात्र त्याचा कुठलाही आजपर्यंत ठोस पुरावा आपल्या भारता मध्ये आढळून आलेला नाही. त्यामुळे अजगर सापाला मारणे हे चुकीचे आहे. तो अत्यंत कमी संख्येत असल्यामुळे असा कुठलाही साप दिसला तर आम्हाला कळवा, मारू किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका असे सर्पमित्र’ कायरकर यांनी गावातील लोकांना समजून सांगितले.
अजगर सापाचा वजन व आकार मोजून त्याची वनविभागा मध्ये नोंद करून वनरक्षक पंडित मेकेवाड, व वन चौकीदार देवेंद्र उईके यांच्या समक्ष आलेवाही जंगलामध्ये सुरक्षित ठिकाणी सोडून जीवनदान दिला.
यावेळेस स्वाब नेचर केअर संस्थेचे सदस्य प्रशांत सहारे , कैलास बोरकर , कृणाल रामटेके, वेदप्रकाश मेश्राम, यश कायरकर, गिरीधर निकूरे आदी उपस्थित होते.