ताडोबा पर्यटनाची सुरुवात: ताडोबात सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी

0
482

जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 14 एप्रिल 2021 पासून बंद असलेला व्याघ्र प्रकल्प रीतसर पद्धतीने सुरू करण्यात आलेला आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आज दि.1 ऑक्टोबर 2021 रोजी नेहमी प्रमाणे मोहर्ली पर्यटन गेटची पूजा करण्यात आली यावेळेस ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर, मोहर्ली (वन्यजीव) वनपरिक्षेत्र अधिकारी एस. के.शेंडे, क्षेत्र सहायक विलास कोसनकर, वन कर्मचारी, सारस रिसोर्ट मालक विवेक वेखंडे, टाइगर वैली रिसोर्ट संचालक संजय ढिमोले, जिप्सी मालक गजानन बापट,मोहर्ली गट ग्रामपंचायत सरपंच सौ. सुनीता कातकर भामडेळी उपसरपंच शामल नन्नावरे मोहर्ली गेट वरील सर्व गाईड, ड्रायव्हर जिप्सी मालक आदि उपस्थित होते.
प्राप्त माहितीनुसार सुरुवातीचे तीन दिवस सफारी फुल आहे. तसेच ताडोबा बफर झोनचे सर्व 15 पर्यटन गेट पर्यटनासाठी उघडण्यात आले आहेत. याशिवाय, जुनोना, नवेगाव-रामदेगी आणि पळसगाव या 3 गेट वरुन रात्रीच्या पर्यटनास परवानगी असून प्रत्येक गेटमधून 6 जिप्सीची परवानगी आहे. ताडोबा बफर मध्ये बोटिंग, कयाकिंग, माचन स्टे, सायकलिंग, वॉकिंग ट्रेल्स आणि पक्षी निरीक्षण यासारखी इतर आकर्षणे देखील आहे.
तसेच यावेळेस वन विभागा तर्फे बरेच नवीन उपक्रम राबविन्यात येत आहे. सफारी दरम्यान ढंड पानी पिण्यास गाईड करिता वाटर फ़िल्टर देण्यात येत आहे. जेने करून जंगल परिसरात प्लास्टिक बोतलचा उपयोग कमी होणार तसेच सफारी दरम्यान नास्ता करण्यास ताडोबा येथे पंचधारा विसावा इंटरप्रिटेशन सेंटर तयार करण्यात आले पर्यटक कोणत्याही प्रकारचा प्लास्टिक जंगलात फेकू नये याची काळजी घेतली जात आहे. ताडोबाने सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातल्याने पर्यटकांना प्लास्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेले स्नॅक्स आणि प्लास्टिकच्या टिफिन बॉक्ससह आत प्रवेश दिला जाणार नाही.
पहिल्या सफारीत चार वाघा सोबत जंगली कुत्र्याच्या कड़पाचे दर्शन पर्यटकाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here