जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
चंद्रपूर जिल्ह्यातील बाबूपेठ जुनोना मार्गाने वेघात येत असलेल्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन चितळ जागीच ठार झाल्याची घटना दि. 30 जून 2024 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सविस्त वृत्त याप्रमाणे आहे की,पक्षी निरीक्षक विवेक वाघमारे हे जुनोनाच्या जंगलामध्ये पक्षी निरीक्षणाकरिता सकाळ च्या सुमारास निघाले असताना त्याला रस्त्यावर एक चितळ तर काही अंतरावर दुसरा चितळ मृत अवस्थेत आढळून येताचं त्यांनी सदर घटनेची सूचना वनविकास महामंडळ चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एन. मेश्राम आणि क्षेत्र सहाय्यक डी.जे. कांबळे, यांना दिली. माहिती मिळताच वन कर्मचारी घटना स्थळी हाजर झाले व त्यांनी मौका पंचनामा केला.
मृत अवस्थेत असलेल्या दोन्ही चितळाचा शवविच्छेदन करण्यास डॉ. कुंदन पोडशेलवार यांना बोलविले. शवविच्छेदन करून त्यांना जवळच अग्नी देण्यात आले.
यावेळेस मार्ग सुरक्षा समितीला वन्यजीव प्रेमी दिनेश खाटे यांनी रस्त्यावर गतिरोधक बनवून वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची अपील केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून नागभीड- चंद्रपूर ,चंद्रपूर- बल्लारशा, चंद्रपूर -पोंभुर्णा, असे रस्ते गेलेले आहेत आणि या रस्त्यावरून होणारी मोठ्या प्रमाणात वाहतूक, व वन्य प्राण्यांचा हाच भ्रमण मार्ग असल्यामुळे सतत या रस्त्यावर वन्यप्राणी अपघातात मारले जातात. त्यामुळे वनविभागाने व रस्ते महामंडळाने या गोष्टीला गांभीर्याने घेऊन वन्यजीवांच्या सुरक्षेकरिता उपाय करणे गरजेचे आहे.