आदरणीय व माननीय नितीनजी काकोडकर सर,I.F.S., हे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव या पदावरून दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले .महोदय हे 1987 च्या batch चे IFS अधिकारी आहे. काकोडकर सराना वन्यप्राण्या विषयी आकर्षणामुळेच त्याचा जास्तीत जास्त काळ हा वन्यजीव विभागात गेला. त्यांनी आपल्या कार्यकालात घेतलेल्या अनुभवांवर लिहिलेले पुस्तक TADOBA, THE UNTOLD STORY हे आहे.त्यांना ताडोबाचे शिल्पकार पण म्हटले जाते. आपण जी प्रसिद्धी ताडोबाची बघतो त्यात महोदयांचा सिंहाचा ( वाघाचा ) वाटा आहे यात शंकाच नाही. महोदय हे एक वटवृक्ष आहेत. ज्याच्या सावलीत अनेक कर्मचारी व अधिकारी तयार झालेत.
अनेक नवीन नवीन योजना त्यांनी आणल्यात आहेत.
उल्लेख करायचा झाल्यास,मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जलद बचाव चमुची महाराष्ट्रात स्थापना त्यांनीच केली. आज सर्व चमू उत्कृष्ठ काम करत आहेत. वन विभागात पशुचिकिस्तकाचे महत्व ओळखून महोदयांनी पशु चिकित्सा अधिकारी वन्यजीव ही पदे असावीत या बद्दल प्रस्ताव शासनाला सादर केला व पदे मंजूर करून घेतली.महोदय सेवानिवृत्त जरी होतील तरी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्वांनाच मिळत राहील.
महोदयांचे सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखाचे,समाधानाचे व उत्तम आरोग्याचे राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
सेवानिवृत्ती ही कोणत्याही रस्त्याचा शेवट नसून एका नवीन highway ची सुरवात आहे.
सेवानिवृत्तीच्या। हार्दिक शुभेच्छा
जयहिंद जय महाराष्ट्र
अमोल अनिल मेश्राम
शिवसेना,युवासेना,जिल्हा सचिव
कामगार सेना
जिल्हा संघटक,भारतीय आदिवासी स्वयंमसेवक संघटना