‘प्लास्टिक मुक्त पर्यावरण मोहीम राबवून जत्रे मध्ये हातात फलक घेऊन दोन दिवस जनजागृती केली व तसेच दोन्ही पर्यटन स्थळ प्लास्टिक मुक्त केले
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील प्रसिद्ध तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदेडा, व गोंदेडा येथील इको पार्क परिसर स्वाब संस्थेच्या स्वच्छता मित्रांनी प्लास्टिक मुक्त पर्यावरण मोहीम राबवून दोन दिवस जनजागृती केली व जत्रा संपल्यानंतर परिसर संपूर्णपणे प्लास्टिक मुक्त केले.
पर्यावरण संरक्षण व संवर्धन करनारी ‘स्वाब’ संस्था गेल्या कित्येक वर्षापासून पर्यावरण व जंगलातील वन्य जीवाच्या सुरक्षेसाठी धोका असलेले ‘प्लास्टिक प्रदूषण नष्ट करण्याच्या’ उद्देशाने ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे त्या जंगल परिसरातील धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ, जंगलालगतचे रस्ते, व तलाव परिसर प्लास्टिक मुक्त करण्याकरिता ‘स्वाब’ संस्था ‘प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान’ राबवून प्रत्येक महिन्याला अशा जंगल परिसरातील किंवा जंगला लगतच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन श्रमदानातून प्लास्टिक पत्रावळी, बाटल्या, दारूच्या बाटल्या, पिशव्या, प्लास्टिकच्या कचरा, गोळा करून त्याच्या योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त करीत असते.
दर वर्षी तपोभूमी गोंदेडा येथे दोन दिवसाची यात्रा असल्यामुळे हजारो भाविक या यात्रेला येत असतात. व नंतर परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक प्रदुषण पसरलेला असतो. त्यामुळे या यात्रेमध्ये जाऊन संस्थेच्या स्वच्छता मित्रांनी हातात फलक घेऊन दोन दिवस जत्रेमध्ये फिरून प्लास्टिक कचरा पर्यावरणासाठी हानिकारक असल्यामुळे ‘प्लास्टिक कचरा पर्यावरणात कुठे फेकू नये, प्लास्टिक हटाओ पर्यावरण बचाओ, असे फलक हातात घेऊन जनजागृती केली. व गोंदेडा यात्रा संपल्यानंतर परिसरात सर्वत्र विखरलेला प्लास्टिक पत्रावळी, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक पिशव्या ,असा मोठ्या प्रमाणात परिसरात विखुरलेला प्लास्टिक कचरा गोंदेडा इको पार्क पर्यटन स्थळ व प्रसिद्ध तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदेडा या क्षेत्र परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून प्लास्टिक मुक्त केले.
यावेळी या प्लास्टिक मुक्त कार्यात संस्थेचे तळोधी, सावरगाव, खडकी, घोडाझरी, वाढोणा, किटाळी , बोंड, सावरला, मिनघरी, महादवाडी,येथील स्वाब संस्थेचे स्वच्छता मित्र यश कायरकर, अनिल लोनबले, नितीन भेंडाळे, छत्रपती रामटेके, जिवेश सयाम, विनोद लेनगूरे, आमीर करकाडे, कैलास बोरकर, भोलेनाथ सुरपाम, शुभम निकेशर, होमदेव दुधपचारे, अमन करकाळे, विकास लोनबले, सुमीत गुरनूले, गोपाल कुंभले, मिनेश कुंभले, आकाश मेश्राम, गिरीधर निकूरे, तथा संस्थेच्या महीला स्वच्छता मित्र अपुर्वा मेश्राम,पायल कायरकर, अंजली गुरनूले, सत्यभामा नन्नावरे, स्नेहल गुरनूले, यांनी श्रमदानातून ही स्वच्छता मोहीम राबवली तर यावेळी वन विभागाचे नेरीचे क्षेत्र सहाय्यक चंद्रशेखर रासेकर, काजळसर चे वनरक्षक के, जी.पाटील, बोळधा चे वनरक्षक संभाजी वळजे, तथा वनमजूर उपस्थित होते.