
भद्रावती –
दिनांक 26 फरवरी शुक्रवारला आयुध निर्माणी परिसरात पाईप मध्ये बिबट्या मृत्यूमुखी पडल्याची घटना उघडकीस आली.
बिबट्याच्या अंगावर असलेल्या जखमा वरून दोन बिबट्याच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला असावा असे वनविभागाचा प्राथमिक अंदाज वर्तविलें जात आहे
मृत बिबट मादी जातीची असून तीचे वय आठ ते नऊ महिने आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच रात्री 07 वाजताच्या सुमारास वनविभागा चे पथक घटना स्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले
या परिसरात वाघ, बिबट अस्वल हे नेहमीच वावर असल्याचे आढळून आले आहे.
मागील वर्षी जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एक बिबट व दोन अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना याच परिसरात घडली होती. त्यांमुळे घातपात तर नाही म्हणून वनविभाग तपास करीत आहे.
यावेळी डॉ. कुंदन पोलचरवार पशुवैद्यकीय अधिकारी , डॉ. एकदा शेडमाके पशुधन विकास अधिकारी, एस पी राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी ,सारिका जगताप विभागीय वन अधिकारी एन व्ही हनवते क्षेत्रसहाय्यक भद्रावती कर्मचारी आदि उपस्थित होते.
