(स्वाब चे या पावसाळ्यात 300 पेक्षा अधिक विषारी, बिनविषारी, निमविषारी, सापांना जीवदान,तर 25 हून अधिक गावांमध्ये सापाबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम)
चंद्रपूर:
नागभीड तालुक्यातील मंगरूळ येथे घरात एक अजगर असल्याचे व एक अजगर कोळ्याचे जाळ्यात अडकला असल्याची माहिती स्वाब संस्थेच्या सर्प रक्षकांना देण्यात आली.घरात घुसलेल्या सापाला वनरक्षक सिडाम यांच्या मार्गदर्शनात वनमजूर सचिन चिलबुले यांनी धानाच्या बोरीमध्ये पकडून ठेवले होते नंतर जाऊन त्याला सुरक्षित काढले. दोन्ही अजगर पैकी एक आठ फूट लांबीचा तर एक अजगर साडेसहा फूट लांबीचा होता. वन कर्मचाऱ्यांच्या समक्ष दोन्ही अजगर यांना जंगलात सुरक्षित सोडले.
विशेष म्हणजे येत्या पावसाळ्यात ‘स्वाब संस्थेच्या सर्पमित्रांनी’ या दोन अजगरांसोबतच परिसरातील अनेक गावांमधून येत्या पावसाळ्यात नाग, मन्यार, घोणस सारख्या विषारी. तर अजगर,धामण, रुका, तस्कर, धूर नागिन, वाळा सारख्या बिनविषारी. तर मांजर्या , रेती सर्प व ‘फार्स्टन कॅट स्नेक’ सारख्या निम विषारी प्रजातीच्या अजगरासारख्या भारतीय सर्वात मोठा साप पासून तर चंचुवाडा सारख्या भारतातील सर्वात लहान सापापर्यंत अशा एकूण 300 हून जास्त सापांना पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान दिले.
सोबतच सापाबद्दल च्या अंधश्रद्धा व गैरसमज दूर करणे व सापाबद्दलची जनजागृती करून सर्पदंश झाल्यास परिसरात मानव मृत्यूचे प्रमाण शुन्य टक्के करन्याचे धेय्य ठेवून परिसरातील 25 गावांमध्ये सलग महिनाभरात शारदा, दुर्गा , गणेश, उत्सव इत्यादी दिवशी जाऊन रोज रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत साप अंधश्रद्धा विज्ञान या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजनही या संस्थेने केले. यामुळे परिसरातील लोक लोकांच्या मनातील सापाबद्दलची भीती दूर होऊन साप संरक्षणाबद्दलची जागरूकता निर्माण झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात गावागावातून सर्प आढळून आल्यास या संस्थेच्या सर्पमित्रांना फोन येतात. व लगेच संस्थेचे सर्पमित्र रात्र असो की दिवस, ऊन असो की पाऊस संकटात सापडलेल्या सापांना पकडून जिवदान देतात.
हे कार्य स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख व सर्पमित्र जीवेश सयाम,जीवन गुरमुले, महेश बोरकर ,यश कायरकर,अमन करकाडे, विकास लोणबले, छत्रपती रामटेके, नितीन भेंडाळे,भोलेनाथ सुरपाम, हितेश मुंगमोडे, अमिर करकाडे, हे सर्पमित्र करीत असतात.