वायगाव गावात घुसलेल्या वाघिणीच्या बछडीला वन विभागाने सुरक्षित रेस्क्यू केले

0
1091

(उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील,भगवानपूर बीटातील वायगाल येथील घटना)
जिला प्रतिनिधी (यश कायरकर):
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या उत्तर ब्रह्मपुरी क्षेत्रातील भगवानपूर बीटातील वायगाव या गावांमध्ये रात्री अचानक वाघ घुसल्याची माहिती आज दि. 30 सप्टेंबर रोजी वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच वनविभागच्या टीमने घटनास्थळी जाऊन दोन घरांच्या मध्ये असलेल्या शिडीमध्ये घुसलेल्या वाघाला सुरक्षित पिंजऱ्यात पकडले.
सविस्तर वृत्त असे की, ब्रम्हपुरी तालुक्यातील जंगलालगत असलेल्या उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील भगवानपूर बीटातील वायगाव या गावात दोन घरांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत एक वाघ लपून बसल्याची माहिती वन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पिंजरे लावले त्यानंतर सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास ही वाघीणची बछडी पिंजऱ्यात अडकली त्यानंतर तिला उचलून ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी येथील कार्यालय परिसरात वैद्यकीय तपासणी करीता नेण्यात आले. व त्यानंतर चंद्रपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व बायलॉजिस्ट राकेश अहुजा यांनी वैद्यकीय तपासणी केली.


यात पकडण्यात आलेली वाघीण ही अंदाजे चार ते पाच महिने वयाची एक मादा वाघीण छावक असल्याचे निदर्शनास आले. रात्री आपल्या आई सोबत जंगल परिसरातून गावालगत भटकत असताना अचानक आपल्या आई पासून दूर होऊन ही या गावात घुसली असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला.


मा.मुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर चंद्रपूर वन वृत्त चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात  ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी चे उपवन संरक्षक राकेश सेपट यांच्या नेतृत्वाखाली उत्तर ब्रह्मपुरीचे  वनपरिक्षेत्र अधिकारी यस. बी. नरड व तळोधी वन परिक्षेत्र अधिकारी आरुप कन्नमवार नागभीड वनपरिक्षेत्र(अ.का.) यांनी ही सुरक्षित रेस्क्यूची कारवाई तात्काळ व यशस्वीपणे पूर्ण केली. यावेळी वनविभागाची आर. आर. यु. टीम, नागभीडचे वनरक्षक एस.एस. कुथे, वनरक्षक नवघरे, तळोदीचे वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक लोणबले, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेकर यांनी N.E.W. संस्थेचे पंकज माकोडे, स्वाब संस्थेचे बचाव पथकाचे यश कायरकर, जीवेश सयाम, छत्रपती रामटेके, महेश बोरकर, अमन करकाडे, अमीर करकाडे, शुभम निकेशर, गणेश गुरनुले, विकास लोणबले सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here