अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्मिळ खवल्या मांजराचा मृत्यू : नागभीड वनपरिक्षेत्रातील घटना

0
249

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
आज 29/9/2024 रोजी नागपूर – नागभीड हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत रात्री अंदाजे एक वाजता चे दरम्यान एका अडीच वर्षे वयाच्या मादा खवल्या मांजराचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली.
सविस्तर वृत्त याप्रमाणे की रात्री एक वाजता च्या दरम्यान नागपूर कडून येणाऱ्या एका इसमास रस्त्याच्या कडेला एक खवला मांजर मृत अवस्थेत असल्याचे निदर्शनाखाली त्याने त्या खवल्या मांजराला रस्त्याच्या बाजूला काढून ठेवून सकाळीच वन विभागाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळतात नागभीडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार (अतिरिक्त कार्यभार) यांनी आपल्या चमू सोबत घटनास्थळाला भेट दिली.

सदर घटना ही नागपूर नागभीड हायवेवर बामणी फाट्यावर घटल्याचे व नागपूर कडून नागभीड कडे येणाऱ्या वाहनाने अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक नेरलावार यांनी मोक्का पंचनामा करून मृत खवले मांजराला शव विच्छेदनाकरिता वनपरिक्षेत्र कार्यालय नागभीड येथे आणले. यावेळेस वनरक्षक कुथे व जीवतोडे हे उपस्थित होते.
सहाय्यक उपवनसंरक्षक महेश गायकवाड व सहाय्यक उपवनसंरक्षक चोपडे सर यांच्या उपस्थितीत मृत खवल्या मांजराचा शव विच्छेदन कृषीधन विकास अधिकारी डॉ ममता वानखेडे नागभीड यांनी केले. नंतर मृत मांजरास नागभीड वन परिक्षेत्र कार्यालय परिसरात जाळण्यात आले. अज्ञात वाहना विरोधात वन गुन्हा दाखल करून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात येत आहे.


विशेष म्हणजे दुर्मिळ असलेले खवल्या मांजर हे परिसरात जंगलात जिवंत फिरताना आढळून येत नाही मात्र जवळपास पाच वर्षाच्या पूर्वी सुध्दा अशाच प्रकारे 23/10 /2019 या तारखेला सावरगाव- वाढोणा रस्त्यावर तळोदी (बा.) वनपरिक्षेत्रामध्ये सुद्धा एक अंदाजे चार वर्षे वयाचा नर खवल्या मांजर रोड अपघातात मृत्यू झाल्याचं आढळून आलेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here