अस्वलीच्या शिकारी प्रकरणी गडचिरोली जिल्ह्यात 7  इसमाना अटक

0
157

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
गडचिरोली जिल्हयातील घनदाट जंगलात कोरोना काळानंतर वन्यप्राण्यांचा वावर थोड्या अधिक प्रमाणात वाढलेला असुन वन्यप्राण्यांच्या शिकारीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हयातील आलापल्ली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पेडीगुडम वन परिक्षेत्रातील चंदनवेली जंगल परिसरात अस्वलाची शिकारा करुन मासाची विल्हेवाट लावत असतांना एकन वेळी वनविभागाच्या पथकाने धाड टाकून अस्वलाचे मास, डोके व पाय जप्त केल्याची कारवाई चार दिवसांपूर्वी करण्यात आली आहे . सदर प्रकरणात वनविभागाने 7 जणांना अटक करण्यात आली आहे.
आलापल्ली वनविभागाअंतर्गत येत असलेल्या पेडीगुडम वन परिक्षेत्रातील चंदनेवली जंगल परिसरात गेडा गावातील काही लोकांनी अस्वलाची शिकार करून मासाची विल्हेवाट लावण्यात येत असल्याची माहिती वनविभागला मिळताच सदर घटनेच्या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पथकाने गेदा गावात छापा टाकला असता शिकार करणाऱ्यांना वनविभागाची चाहुल लागताच गावातून पळ काढला. या दरम्यान वनविभागाने पथकाने गस्त घालुन पहाटेच्या सुमारास आरोपींना डब्बा पोहचविणाऱ्या एका व्यक्तीला पकडले व 10 जून रोजी पथकाने घटनास्थळी पोहचून तपासणी केली केली असता नाल्याच्या काठावर मचान तयार करून काही लोक जनावराचे मास शिजवितांना दिसून आले. तसेच मचानच्या बाजूला अस्वलाचे डोके व पाय लटकलेले दिसून आल्याने त्यांना घटना स्थळी अटक करण्यात आली. व पुढील कार्यवाही वन विभागा मार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here