तळोधी (बा.):
तळोधी येथील पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, वनपरिक्षेत्र कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, नवोदय विद्यालय, तसेच मेंडकी येथील ग्रामपंचायत कार्यालय पोलीस चौकी वन विभागाचा नाका तर बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी *’स्वाब’ फाउंडेशनच्या’* वतीने पक्षांना उन्हाळ्यात पाणी प्यायला त्यांच्या पाण्याची सोय होण्याकरिता , ‘पक्षी घागर वितरित’ करून त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने बांधून त्यामध्ये पाणी टाकण्यात आले. व सोबतच या ठिकाणी रोज पाण्याची व्यवस्था करावी व जमल्यास स्वतःकडून सुद्धा काही पक्षी
घागर बांधण्यात यावे असे मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.
विशेष म्हणजे ‘पक्षी घागर वितरित’ कार्यक्रमाचे मुख्य उद्देश्य म्हणजे पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी प्यायला मदत करणे. ज्या स्थळी पक्ष्यांना घागर (वाटण) उपलब्ध नसतो त्या स्थळावर पक्ष्यांना पाणी प्यायला देण्यासाठी ही विशेष सुविधा प्रदान करणे व तसेच पक्षी घागर करिता पाण्याची व्यवस्था करण्याचे उपाय सुचविण्यात आले. ज्यामुळे पक्ष्यांना आवडत असलेल्या स्थळावर रोजच्या उन्हाळ्यात पाणी मिळेल व त्या सुंदर पक्ष्या विषयी लोकांना आवड निर्माण होईल.
स्वाब संस्थेचे वतीने तळोधी , मेंडकी, बाळापुर, सोबतच ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभीड, येथे ह्या पक्षी घागर वाटप करण्यात आले. यावेळी प्रत्येक कार्यालयांमधून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला , ब्रह्मपुरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री खोसरे सर व इतर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सुद्धा सर्वांनी “स्वाब” च्या कार्याचे कौतुक करत त्यांची सराहना केली. व आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यास सहकार्य करू अशी हमी दिली.
यावेळी स्वाब नेचर केअर फाउंडेशनचे यश कायरकर, भोलेनाथ सुरपाम, जिवेश सयाम, स्वप्निल मेश्राम,(पक्षी मित्र) अक्षय मेश्राम, नितीन भेंडाळे, अमन करकाडे, गोपाल कुमले, छत्रपती रामटेके, कैलास बोरकर, अमीर करकाडे, शुभम निकेशर, गिरीश निकूरे आदी उपस्थित होते.