जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
दि.8 मे 2024 रोजी बल्लारपूर वनपरिक्षेत्रात गस्त करत असताना वनकर्मचाऱ्यांना बल्लारशाह वन परिक्षेत्रातील कलमना उपक्षेत्र , वन कक्ष क्र. 571 रोजी सकाळी 8.00 वाजताच्या सुमारस 1 वर्षीय वयाची एक वाघीण मृत अवस्थेत आढळून आली होती.)
बल्हारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा बल्हारशाह पर्यटन जंगल सफारी मध्ये दि.13 मे 2024 ला बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी गस्त करीत असतांना सकाळच्या सुमारास सफारी दरम्यान कक्ष क्रं. 510 नियतक्षेत्र किन्ही येथे दोन वाघाच्या झुंजीत एक अडीच वर्षीय नर वाघाचा मृत्यु झाल्याचे घटना उघडकीस आली.
पुढील कार्यवाही करण्यास घटना स्थळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी बंडु धोतरे यांना बोलावुन यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन वन्यप्राणी (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये प्राथमीक वनगुन्हा क्रमांक 08961/224013 दिनांक 13 मे 2024 जारी करुन मृत वाघाचे शव ताब्यात घेण्यात आले व शवविच्छेदनाकरीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले. मृत बछड्याचे शवाचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचलवार, पशवैद्यकीय अधिकारी TIC चंदपर व डॉ. आनंद नेवारे, पशुवैद्यकीय अधिकारी, चंद्रपुर यांनी केले.
सदर प्रकरणात पुढील तपासाकरीता मृत वाघाचे सिलबंद नमुने घेण्यात आले असुन ते रासायनीक विश्लेषणाकरीता वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठविण्यात येणार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.
सदर कार्यवाही पुर्ण करण्याकरीता क्षेत्र सहाय्यक व्हि.पी. रामटेके, बि.टी.पुरी, वनरक्षक कु. वैशाली जेणेकर, कु. माया पवार, रंजीत दुर्योधन, परमेश्वर आनकाडे, एस.एस. नैताम व मनोहर धाईत व रोजंदारी वनसंरक्षण मजुर यांनी सहकार्य केले.
*मृत्यूचा आकडा वाढत आहे, वाघांच्या संख्येत होणारी भर आणि अस्तित्वासाठी आपसी झुंज याच्यातून हे प्रकार घडतच जाणार मात्र ही बाब चिंताजनक आहे*
चंद्रपूर जिल्ह्यात या आठवड्यात 2 तर गेल्या सात महिन्यांत एकूण 13 वाघांचा मृत्यू झाला आहे. चिमूर वन परिक्षेत्रात 14 नोव्हेंबर रोजी 2
वाघांच्या संघर्षात एका वाघाचा मृत्यू झाला होता, ताडोबात 18 नोव्हेंबरला वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. 10 डिसेंबर रोजी वरोरा वन परिक्षेत्रात एका वाघाचा अपघाती मृत्यू झाला, 14 डिसेंबर रोजी पळसगाव येथे एका वाघाचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला, तर 21 डिसेंबर रोजी सिंदेवाही रेंजमध्ये एका वाघाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. 24 डिसेंबर रोजी शिकार शोधत असताना तळोधी बा यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. जंगल परिसरात वाघाचा मृत्यू झाला होता. तर सोमवार, 25 डिसेंबर रोजी सावली वनपरिक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत मादी वाघिणीचा मृतदेह आढळून आला, तर पुन्हा जिल्ह्यात नवीन वर्षात 15 जानेवारी रोजी बोर्डा सर्व्हे नंबर 250-1 मधील शेतात गस्त घालत होती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागात वाघाचा मृतदेह आढळून आला. दोन वाघांच्या मारामारीत वाघाचा मृत्यू झाला असावा, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्या वाघाची ओळख T-51 असे होते. आणि 20 जानेवारी रोजी भद्रावती तहसीलमधील चालबर्डी येथील शेताच्या आवारात एका विहिरीत वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. तर 22 जानेवारी रोजी ताडोबातील 338 सेल क्रमांकाच्या खतोबा तलाव परिसरात 2 वाघ मृतावस्थेत आढळून आले. आणि 8 मे ला पुन्हा या 1 वर्षाच्या मादी वाघिणीचा बल्लारशाह वन परिक्षेत्रातील कळमना उप-क्षेत्रातील वन कक्ष क्रमांक 571 मध्ये मृत्यू झाला. तर आज पुन्हा बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी गस्त करीत असतांना कक्ष क्रं. 510 नियतक्षेत्र किन्ही येथे दोन वाघाच्या झुंजीत एक अडीच वर्षीय नर वाघाचा मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली. तर गेल्या सात महिन्यांपासून जिल्ह्यात अशाच प्रकारे 13 वाघांचा मृत्यू होण्याचे प्रकार सुरू असून, मृत्यूचे प्रमाण वाढत असून वाघांची संख्या कमी होणे हे गंभीर विषय आहे.