
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
शिवनी वनपरिक्षेत्रातील कुकडहेटी उपक्षेत्रातील पेटगाव बीट कक्ष क्र. 322 मध्ये मौजा बामणीमाल येथील तेंदूपत्ता गोळा करण्यास गेली असता महिलावर दिनांक 4 मे 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता सुमारास सौ. दीपा दिलीप गेडाम (33) वर्षीय महिलेला परिसरात असलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळतात घटनास्थळी पोहचून मौका पंचनामा करून इतर प्रक्रिया पार पाडली.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनी विदेशकुमार गलगट, क्षेत्रसहाय्यक एस.वाय. बुले, क्षेत्र सहाय्यक नल्लेश्वर, पेंदोर , क्षेत्र सहायक शिवनी प्रधान, वनरक्षक मडावी , कोवे, शेख, भारत मडावी , कु सवसाकडे आदी कर्मचारी, वनमजूर व तसेच PRT सदस्य उपस्थित होते.
सदर घटनेत मृतक महिलेचे शव सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता नेण्यात आले व तसेच वनविभागा कडून तातडीची मदत म्हणून 50000/-रुपये मृतकेच्या पतीला देण्यात आले.
वनविभागा तर्फे परिसरातील लोकांना जंगलात दक्षता बाळगण्याची सूचना देण्यात आले व घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा लावून हमला करणाऱ्या वाघावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
