जागतिक पशुचिकित्सा दिनानिमित्य चंद्रपूरातील जलसंकटावर लक्ष देत ‘बर्ड्स केअरिंग फाउंडेशन’चं शिक्षणार्थी आणि नागरिकांचं उत्तम प्रयत्न

0
142

चंद्रपूर : जागतिक पशुचिकित्सा दिनानिमित्याने दि. २८ एप्रिल २०२४ बर्ड्स केअरिंग फाउंडेशन तर्फे पाली बुद्ध विहार येथे समस्त उपस्थित विध्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना जलपात्र वाटप करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते , त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होते त्यामुळे  पक्ष्यांना योग्य त्या प्रमाणात पाणी मिळत नाही व त्यामुळे पक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. यावर योग्य उपाय करण्याकरिता विध्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना जलपात्र वाटप करण्यात आले.


सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. माडेकर यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धन कसं करावे तसेच पशु-पक्षी, वने आणि वन्यजीव यांचे रक्षण कसे करावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळेस  माजी नगराध्यक्ष संपत कोरडे बर्ड्स केअरिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर शेख, सचिव शुभम गेडाम, कोषाध्यक्ष प्रविण कुंभारे, सदस्य आफताब पठाण, निकेत कोरडे, आशिष गेडाम, संध्या कोरडे, अजान शेख आदि मोठ्या संख्येत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here