T86 M नर वाघाला बल्लारशाह कारवाच्या जंगल परिसरात जेरबंद करण्यात आला: “वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने मिळाला यश”

0
252

चंद्रपूर : मागील काही दिवसापासून  बल्लारशाह कारवा परिसरात धुमाकूळ घालणारा व त्या परिसरातील 4 इसमास ठार करणारा T86 M नर वाघाला जेरबंद करण्यास बल्लारशा वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले.

बरेच दिवसापासून  T86 M वाघाचा शोधात  दिवस-रात्र गस्त सुरू होते व त्या परिसरात ट्रॅप कॅमेरा देखील लावण्यात आले होते. अखेर बरीच परिश्रमानंतर दि. 29 एप्रिल 2024 रोजी नियत क्षेत्र बल्लारशाच्या कंपार्टमेंट नंबर 494 मधील ट्रॅप कॅमेरा मध्ये T86 M वाघ निर्देशनास आले असता बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांबरोबर वाघाला जेरबंद करण्याची मोहीम राबविली व अखेर T86 M  वाघाला सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास जेरबंद करण्यास यश मिळाले.
यावेळेस कुंदन पोहचलवार पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव उपचार केंद्र, TATR चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात शूटर विलास फुलझले वनरक्षक यांनी डॉट मारले व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात वाघाला जेरबंद करण्यात आले.
पुढील तपासणी करिता T86 M वाघाला वन्यजीव उपचार  केंद्र चंद्रपूर येथे नेण्यात आले.
सदर T86 M वाघ हा अंदाजे 10 वर्षाचा असल्याचे  पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोहचलवार यांनी सांगितले.
वनविभागातर्फे बल्लारशाह कारवाच्या जंगल परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असल्याने  जंगलात जाण्यास सक्त  मनाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here