(सामाजिक वनीकरण सिंदेवाही व ‘स्वाब फाउंडेशन’ यांच्या वतीने आयोजन)
सिंदेवाही:
सामाजिक वनीकरण सिंदेवाही वतीने पर्यावरण मार्गदर्शन व पर्यावरण संबंधित गोष्टी जाणून घेण्याकरिता सिंदेवाही तालुक्यातील पाच शाळांच्या विद्यार्थ्यांना जंगलामध्ये भ्रमंती करून ‘चला जाणूया वनाला’ या उपक्रमाचे आयोजन केले. त्यानुसार आज दि. २८ फरवरी रोजी ‘सरोदय कन्या विद्यालय सिंदेवाही व महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही’ येथील एकूण 80 विद्यार्थी व 10 शिक्षक शिक्षिकांना सोबत घेऊन जंगल भ्रमंती केली आणि पक्षी निरीक्षण, वन्यजीव, पर्यावरणाच्या अभ्यासांच्या संदर्भात शिक्षणार्थींना शिक्षकांनी मार्गदर्शन केला.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील ‘ढगाबाई तलाव’ या परिसरात सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत तलावाभोवती भ्रमंती करून. जंगलातील बारकावे टिपत पाऊल खुणांवरून वाघ,अस्वल, बिबट यांची ओळख पक्ष्यांच्या आकारमान व दिसण्यावरून व आवाजा वरून त्यांची ओळख. साप सापाच्या विविध प्रजाती त्यांची ओळख आणि अंधश्रद्धा या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पक्षी निरीक्षक रोशन धोतरे चंद्रपूर, व अक्षय मेश्राम नागभीड यांनी पक्षांसंदर्भात बारकावे व स्थानांतरित पक्षी दाखवून मार्गदर्शन केले.
तसेच वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, जंगलात वावरताना जंगलातील नियम व विविध प्राण्यांची ओळख व जंगलाचे महत्त्व या संदर्भात ‘स्वाब’ संस्था’ चे अध्यक्ष वन्यजीव अभ्यासक ‘यश कायरकर’ यांनी परिसर भ्रमंती दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तर सामाजिक वनीकरणाचे सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड यांनी पर्यावरणातील झाडे, त्यांचे संवर्धन कशा पद्धतीने करता येईल, व त्यांचे महत्त्व या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच स्वाब संस्थेचे सर्पमित्र जीवेश सयाम यांनी सापाच्या विविध प्रजाती, सर्पदंश आणि सर्पदंश मागचे कारण, तसेच विषारी/ बिनविषारी सापांची ओळख कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळेस स्वाब संस्थेच्या महिला विभाग प्रमुख कल्पना गेडाम ब्रह्मपुरी, आचल कायरकर, सदस्य स्वप्निल मेश्राम, छत्रपती रामटेके, विनोद लेनगूरे, भोलेनाथ सुरपाम, शुभम निकेशर, अमीर करकाडे, महेश बोरकर, होमदेव दुधपचारे, अमन करकाळे, विकास लोनबले, गोपाल कुंभले, या स्वाब संस्थेचे सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करता परिश्रम घेतले. तर वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, क्षेत्र सहाय्यक मसराम, वनरक्षक भावना तोडसाम मॅडम, वनरक्षक संतोष पेंदाम, वनरक्षक चौधरी यांनी परिसर भ्रमंतीत सहकार्य केले. वनरक्षक श्री मुलमूले सामाजिक वनीकरण सिंदेवाही हे उपस्थित होते.