ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा मध्ये जटायु संवर्धन प्रकल्पाचा मा. ना.सुधीर मूनगंटीवार मंत्री वने यांचे शुभहस्ते शुभारंभ

0
394

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जटायु संवर्धन प्रकल्पाचा शुभारंभ मा. ना.सुधीर मूनगंटीवार, मंत्री, वने, मत्य्स व्यवसाय व सांस्कृतिक संचनालय, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते दि. २१ जानेवारी २०२४ ला करण्यात आले व  त्यांच्या शुभ हस्ते पांढऱ्या पाठीचे 10 जटायु पक्षी प्रिअव्हीयरी मध्ये सोडण्यात आले आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे देश विदेशात वाघासाठी प्रसिद्ध असलेले संरक्षित क्षेत्र आहे आणि अशा महत्वपूर्ण क्षेत्रात नष्ट प्राय होण्याच्या मार्गावर असणाऱ्या जटायु पक्ष्यांचे संवर्धन केंद्र उभारण्यात आले आहे. हे जैवविविधता संवर्धनातील महत्वाची बाब आहे.


भारतात जटायुंच्या ९ प्रजाती आढळतात यापैकी लांब चोचीचे गिधाड व पांढऱ्या पाठीचे गिधाड हे अति धोकाग्रस्त प्रजाती मध्ये समाविष्ट आहे. सन १९९० मध्ये गिधाडांची संख्या चार करोड होती.
पण आता ती संख्या कमी होऊन विविध प्रजाती मिळून सरासरी ५० हजारावर आली आहे.


गिधाड हा निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जातो. मृत झालेले प्राणी गावाच्या वेशीवर टाकल्या जात होते आणि अशा मृत प्राण्यांना खाऊन हे पक्षी निसर्ग स्वच्छ ठेवत असे आणि मानवी जीवांना रोगराई पासून मुक्त ठेवत होते. म्हणून, त्यांना निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखतात.


अशा या जटायु प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गाला मानव निर्मित डाईक्लोफिनेक नावाचे रसायन आहे. हे रसायन सर्व प्रकारच्या जेल, मलम आणि स्प्रे या मधील प्रमुख घटक आहे. पाळीव गुरांना देण्यात येत असलेल्या औषधामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. मृत झालेल्या देहातून या रसायनाला बाहेर टाकण्यास खूप वेळ लागतो. जटायु या प्राण्यांचे भक्षण करतात. अशा प्रकारे डाईक्लोफिनेक रसायन जटायुंच्या शरीरात जाते आणि परिणामी जटायु मरण पावतात. जटायुची संख्या कमी होणे जैवविविधता व निसर्ग चक्राला घातक आहे.


अशा संकटग्रस्त जटायु पक्ष्याला या क्षेत्रात पुन-प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या महत्वपूर्ण पुढाकाराने जटायु संवर्धन केद्राची निर्मिती करण्यात आली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांचे हरियाणामधील पिंजोर येथे गिधाड प्रजनन व संशोधन केद्र सन २००१ पासून कार्यन्वित आहे. या केंद्रातून प्रथम टप्यात पांढऱ्या पाठीचे १० पांढऱ्या गिधाड पक्षी रीतसर शासनाच्या परवानगी प्राप्त करून घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा परिक्षेत्रातील बोटेझरी भागात तयार केलेल्या प्रीरीलीज
अव्हीयारी मध्ये संशोधकांच्या देखरेखित ठेवण्यात आले आहे. आणि  साधारणत: ३ महिन्यानंतर त्यांना निसर्ग मुक्त करण्यात येणार आहेत. हा महत्वपूर्ण प्रकल्पामुळे अति धोकाग्रस्त असलेला या निसर्गातील स्वच्छ दूतांना हक्काचे अधिवास प्राप्त होईल.
या शुभारंभीय कार्यक्रमाच्या  अध्यक्षीय भाषणामध्ये मा. ना. सुधीर मुनगंटीवार, मंत्री , वने, मत्य्स व्यवसाय व सांस्कृतिक संचनालय, महाराष्ट्र राज्य यांनी जटायु संवर्धन प्रकल्प हा अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प असून आपल्या स्वच्छतेच्या दुतांना परत एकदा मोकळ्या आकाशात गगनभरारी मारण्यासाठी मोकळा श्वास देईल आणि यामुळे आपल्या जैवविविधतेमध्ये मोलाची भर पडेल असे महत्वपूर्ण मत व्यक्त केले. तसेच एक महत्वपूर्ण घोषणा केली कि, या वर्षीपासून महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर वनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या जटायु संवर्धन कार्यकमाकरिता उपस्थित मा. प्रविणसिंह परदेशी अध्यक्ष, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इंस्टिट्यूशन फॉर ट्रांसफ़ॉर्मेशन (मित्र) यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त करतांना म्हटले कि, ताडोबा जसे वाघाचा मुख्य अधिवास आहे व प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे या जटायु संवर्धन प्रकल्पाच्या च्या माध्यमातून व्यापक प्रसिद्ध होईल आणि निसर्ग पर्यटनामध्ये मोलाची भर पडेल.
या कार्यमाकरिता मुख्य अतिथी मध्ये मा. महिप गुप्ता (भा.व.से.), प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), किशोर रिठे, संचालक बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई, रवींद्र परदेशी, पोलीस आयुक्त, चंद्रपूर जिल्हा तसेच वरिष्ठ वनअधिकारी यांची ही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जितेंद्र रामगावकर (भा.व.से.) वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी केले. या महत्वपूर्ण कार्यक्रमाकरिता स्थानिक लोक प्रतिनिधी, गावकरी व वन्यजीव प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here