राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करणारे 3 आरोपींना अटक करण्यात वन विभागाला यश

0
443

चंद्रपूर : राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार झाले असल्याची गुप्त माहितीच्या आधारे वाघोली येथे वनविभागाने सापळा रचून आरोपीला पकडण्यात यश मिळाले.

सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की  दि.१५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास वाघोली येथील
वन विभागाला माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनकर्मचारी  जे. के. लोणकर क्षेत्र सहय्यक शेगाव, डि. बी. चांभारे क्षेत्र सहय्यक टेमुर्डा, वनरक्षक चंदेल, लडके व बोढे  यांना घेऊन घटणास्थळी पोहचून चौकशी केली.


त्यात आरोपी नामे विलास आडकु नन्नावरे  वय 42 वर्षे पोस्ट शेगाव ता. वरोरा, संयुक्त वनव्यवस्थापन समिती वाघोली अध्यक्ष,  रामदास वामन जिवतोडे वय. 34 वर्षे पोस्ट शेगाव. ता. वरोरा व दिगांबर तुळशिराम गजबे रा. वाघोली वय. 33 वर्षे पोस्ट शेगाव ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचे जवळ मोराचे 3.100 ग्रॅम मास, लोखंडी सुरा 01 नग, लोखंडी हुक 01 नग, मोराचे पाय 04 नग, मोराचे पंख व औषधी टाकलेले धान्य 1 किलो असा मुद्देमाल त्यांच्या जवळून तपास दरम्यान आढळून आला असुन साहित्य जप्त करण्यात आले असुन त्याचेवर प्रा.अ.सु.क्र. 09169/229205 दि. 15 जानेवारी 2024 भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 51 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे व पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here