चंद्रपूर : मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर अंतर्गत बल्लारशा वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कारवा १ येथील राखीव वनखंड क्र. 492 मध्ये दि. 7 जानेवारी 2024 रोजी दुपारच्या सुमारास एका इसमास वाघाने ठार मारले असण्याची घटना उघडकीस आली.
सदर घटनेत मृतकाचे नाव शामराव रामचंद्र तिडयूरवार असे असून तो सरपण गोळा करण्यास गेला असता जवळील झुडपात असलेला वाघाने हल्ला करून जागेस ठार केले.
सदर घटनेची माहिती वनविभागाला प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी भोवरे हे अधिनिस्त वनकर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आले व वन विभागातर्फे नातेवाईकास तात्काळ मदत म्हणून 25000 रु. देण्यात आले.