विद्युत करंटमुळे वाघाचा मृत्यू : ब्रह्मपुरी वन विभागाच्या सिंदेवाही क्षेत्रात शोकाकुल घटना

0
1334

(2023 मध्ये भारतात वाघांच्या मृत्यूची संख्या 158 आहे, त्यापैकी महाराष्ट्रात 42 पेक्षा जास्त वाघांचा मृत्यू ,  तर विदर्भात 36 पेक्षा जास्त आणि त्यात चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 20 वाघांचा मृत्यू)

(पुन्हा एकदा इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच्या दिरंगाई ने वाघ गेला बळी,  वनविभागात खळबळ)

चंद्रपूर :
ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वन परिक्षेत्रातील डोंगरगाव बिटातील मेंढा माल, येथील एका खासगी शेतशिवारात गट क्र. १६४ मध्ये एक वाघ आज दि. 21 डिसेंबर 2023 रोजी सकाळच्या सुमारास शेताकडे गेलेल्या एका शेतकऱ्याला मृत अवस्थेत दिसून आला.
सदर घटनास्थळी वाघाच्या तोंडाला विद्युत करंट लागून मृत्यू झाले असल्याचे निदर्शनास आले.सदर मृत वाघाचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्ष असून नर वाघ आहे.


सदर घटनेच्या  मौका पंचनामाच्या वेळी घटनास्थळी  परिसरातील वन्यजीव प्रेमी यश कायरकर स्वाब नेचर केअर फाउंडेशन, बंडू धोतरे NTCA प्रतिनिधी, विवेक करंबेकर मानद वन्यजीव संरक्षक ब्रह्मपुरी, पंकज माकोडे नेचर एनवोर्मेन्ट अँड वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशन ब्रम्हपुरी,  यांच्या उपस्थित मध्ये मौका पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता सिंदेवाही वन विभागाच्या लकडा डेपो मध्ये नेण्यात आले व शवविच्छेदन करण्यात आले.


यावेळेस डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा, डॉ. शालिनी लोंढे पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही, डॉ. सुरपाम पशुवैद्यकीय अधिकारी सिंदेवाही यांच्या समक्ष करण्यात आले व पुढील तपास सहाय्यक उप वनसंरक्षक चोपडे, यांचे मार्गदर्शनात विशाल सालकर वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही हे करीत असून आरोपींचा तपास कसून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here