
(यश कायरकर):
गडचिरोली जिल्ह्यातील गोविंदपुर येथील एका महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले असल्याची घटना दि. 15 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास सरपण गोळा करण्यास गावाबाहेर गेली असता अचानक वाघाने तिच्यावर हल्ला करून जागेस ठार केल्याची घटना उघडकीस आली.
सदर घटनेत मृतकाचे नाव माया धर्माजी सातपुते रा. गोविंदपूर वय 55 वर्ष असे आहे.
सदर घटनेची माहिती गडचिरोली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना होताच घटनास्थळी आपल्या चमू सह हाजर झाले व घटनेची पाहणी करून मौका पंचनामा करण्यात आला.
परिसरात फिरत असलेल्या वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्याची मागणी व मृतकाच्या परिवारास आर्थिक सहाय्य लवकरात लवकर देण्यात यावे असे ग्रामस्थ करीत आहे.
