ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या मोहर्ली गावाचे सुशोभीकरण व निसर्ग पर्यटन विकासाबाबत सभेचे आयोजन

0
632

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून होणार मोहर्ली गावाचा विकास

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या बफर क्षेत्रातील मोहर्ली गावाचे विकास कामे करण्यासाठी  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून  मोहर्ली गावाचे सुशोभीकरण व निसर्ग पर्यटनाचा विकास होणार.  सदर सभेचे आयोजन वनविभागाचे मोहर्ली विश्रामगृह येथे आज दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता  करण्यात आले.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, मोहर्ली गावाच्या सौंदर्यकरण व पायाभूत सुविधा विकास कामे करण्यासाठी मोहर्ली ग्रामपंचायतचा विकास आराखडा मोहर्लीचे सरपंच सौ. सुनीता कातकर आणि युवराज वेस्खडे ग्रामसेवक यांनी सादर केला. यावर DPR तयार करून या काम करिता लागणारी निधी वनविभाग व इतर विभागाकडून उपलब्ध करून सर्व विकास कामे करण्याचे ठरविण्यात आले.


यावेळेस कुशाग्र पाठक उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, रामपाल पारसनाथ सिंह अध्यक्ष नियामक मंडळ शासन निर्देशित सचिव स्तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर, सौ. सुनीता कातकर सरपंच मोहर्ली, संतोष अतकरे स्वीय सहाय्यक मा. मंत्री (वने), प्रकाश धारणे सदस्य  महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन विकास मंडळ चंद्रपूर, आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी भद्रावती/चंद्रपूर,  संतोष थिपे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (बफर),  संजय जुमडे क्षेत्र सहाय्यक मोहर्ली (बफर), युवराज वेस्खडे ग्रामसेवक मोहर्ली आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here