जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागभीड येथील शेतशिवारात विद्युत तारांच्या स्पर्शाने वन्यप्राणी सह दोन व्यक्ती ठार झाल्याची घटना नागभीड पोलीसाच्या नोंद केल्या नंतर उघडकीस आली आहे.
नागभीड शहराला लगत असलेल्या शेताशिवारात वन्यप्राण्याचा मोठ्या प्रमाणात हौदोस असल्याने शेतपिकाचे वन्यप्राणी नुकसान करू नये यासाठी शेतकऱ्यांना झटका लागून वन्यप्राणीची हानी होऊ नये म्हणून वनविभागाकडून व्यवस्था केली जाते.
तरी देखील शेतकरी वनविभागाकडून दिल्या जाणाऱ्या झटका मशीन ऐवजी विद्युत ताराचा प्रवाह सोडून बंदोबस्त करीत असतात. यामुळे आज दि. २१ सप्टेंबर २०२३ रोजी नागभीड येथील घडलेल्या घटनेत दिसून येत आहे.
सदर घटनेत शेतकरी नारायण दामोधर लेणेकर ह्यांनी आपल्या शेतात पिकाचे वन्य प्राणीचे नुकसान करू नये म्हणून बॅटरी व विद्युत ताराचा प्रवाह आपल्या शेतात सोडण्यात आला होता. यावेळी विद्युत ताराचा प्रवाहात जंगली डुकर अडकून ठार झाला तर त्याच शेताच्या बाजूला असलेला शेतकरी गुरुदास श्रीहरी पिसे (५२) रा.नागभीड ताराच्या प्रवाहात अडकल्याची घटना आज दि. २१ सप्टेंबर २०२३ सकाळी उघडकीस आली असता शेतकरी नारायण लेणेकर यांनी पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रार नोंदविली.
तसेच दुसरी घटना नागभीड शेतशिवारातच दुसरा शेतकरी दाचेवार यांची भाड्याने शेती करतो तो दि. २० सप्टेंबर २०२३ सायंकाळच्या सुमारास सायकलने पाण्याची मोटार पम्प सुरु करण्यास गेला असता त्याला विद्युत ताराचा प्रवाहाचा स्पर्श होऊन अडकल्याने देवनाथ रामदास बावनकर वय ४५, राहणार नागभीड हे दोघेही विद्युत ताराचा प्रवाहाणे ठार झाले असून सदर गुन्हा दाखल करून न्यायालयात शेतकऱ्यांस हजर करण्यात आले असता मान. न्यायालयाने न्यायालय कोठडी सुनावली असून अपराध क्र. ३४४/२४ अन्वये कलम ३०४ भा द वी दाखल करून पोलीस निरीक्षक योगेश घारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश साखरे पुढील तपास करीत आहे. सदर घटनेचा वनविभाग, वीजवितरण कंपनी यांनी ही आपला पंचनामा करून गुन्हा दाखल केले असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.
एकाच दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी दोन शेतकरी गेल्याने नागभीड मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.