(पोंभुर्णा वनपरिक्षेत्रातील घटना, दोन ते अडीच वर्षांचे मृत वाघीनीचे वय)
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या फिस्कुटी येथे जगदिश गावतुरे रा. चंद्रपूर यांच्या शेतात आज दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी सर्वे नं. २९१ एक वाघीण मृत अवस्थेत आढळुन आल्याने वनविभागात खळबळ उडाली.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, फिस्कुटी निवासी पपलु वामन शेंडे हे जगदिश गावतुरे रा. चंद्रपूर यांची शेती करत आहे आणि ते आज सकाळी ७:३० चे सुमारास महीला मजुर घेऊन धान शेतात नींदन करण्यासाठी शेतात गेले असता त्यांना तिथे एक वाघ मृतावस्थेत आढळुन आले व याची माहिती तात्काळ शेत मालकाला दिली. शेत मालकाने फीस्कुटी चे सरपंच मार्फत ही माहिती पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली.
सदर घटनेची माहीती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हाजर झाले व मौका पंचनामा केला .
सदर घटनेची पाहानी केली असता मृत वाघ ही दोन ते अडीच वर्षाची वाघीण असल्याचे निदर्शनास आले.
तसेच मृत वाघाचे नखे, मिशा, दात इत्यादी अवयव शाबूत असल्याचे शहानिशा करून त्याला चंद्रपुर येथील ट्रान्झीट ट्रीटमेंट सेंटर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले व पशु वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून त्याचे मृतदेह तिथेच दहन करण्यात आले.
मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच सांगता येणार असे वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार यांनी सांगितले व पुढील तपास वनविभागा तर्फे सुरू आहे.