अपघातात जखमी झालेल्या वाघाचा उपचारासाठी नेत असतांना मृत्यू

0
198

गोंदिया :
कोहमारा हायवे मधील मुर्दोली परिसरात दि.10 ऑगस्ट 2023 रोजी  रात्री 10.30 च्या सुमारास एका creta कार च्या धडकेत एक नर वाघ गंभीर जख्मी झाला होता.याची माहिती वन विभागाला होताच घटनास्थळी दाखल झाले व त्या जखमी वाघाला उपचारा करिता नागपूर येथे हलवतांनी वाटेतच नर वाघाचा मृत्यू झाला.

सूत्राच्या माहिती नुसार मृत वाघ हा नागझिरा येथिल T14 वाघिणीचा 2 वर्षाचा निम्नवयस्क शवक होता.

दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 5.00 वाजता पासून त्याला रेस्क्यू करण्याचे अभियान सुरु करण्यात आले होते व सकाळी 7.30 च्या सुमारास जखमी वाघाला जेरबंद करण्यात यश आले.
त्याला उपचारा करिता नागपूर येथे  नेतांना वाटेतच त्या वाघाचा मृत्यू झाला.
वाघ गंभीर जखमी झाल्याने तो हालचाल करू शकत नव्हता त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे समजले जात आहे.
पुढील शवविच्छिंदन नागपूर येथील गोरेवाडा येथे दुपारी करण्यात येत आहे.
सदर रेस्क्यू दरम्यान वन विभागाचे उपवसंरक्षक प्रमोद पांचभाई , विभागीय अधिकारी अतुल देवकर, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर, सहायक वनंरक्षक राजेंद्र सदगिर, वन परिक्षेत्र अधिकारी रवी भगत, RRT साकोली- नवेगाव टीम यांचा सहभाग होता.

मुर्दोली परिसरात नेहमीच वाघांचे दर्शन होत असतात आणि या परिसरात हायवे मुळे नेहमी वन्यप्राणी मृत्यू मुखी पडतात व एखाद्या घटनेत वाघाचा देखील मृत्यू होण्याची  शक्यता आधीच वर्तवली होती. सदर रोड नागझिरा – नवेगाव कॉरिडॉर मधील पूर्व नागझिरा परिसरातून जात असून  तिथे आता लवकर mitigation measures (उपाय योजना) करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here