काजवा महोत्सव( Fireflies Festival ) आणि काजवा पर्यटनांवर बंदी घालण्याची मागणी

0
336

(मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य,अध्यक्ष, जैव विविधता मंडळ, महाराष्ट्र राज्य,मुख्य सचिव पर्यावरण विभाग,भारत. यांच्या कडे विविध सेवाभावी संस्था व पर्यावरण प्रेमींची मागणी)

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):

रात्रीच्या वेळी दिसणारे काजवे प्रत्येकांसाठी आकर्षण असतात. तसेच काजव्यांचा समूह दिसणे ही तर एक पर्वणीच ठरते. क्वचितच असे प्रसंग घडतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे की सध्या राज्यात अनेक ठिकाणी ‘काजवा महोत्सव'( Fireflies Festival) सुरू आहे. या ठिकाणी भेट देऊन पर्यटक काजव्यांच्या असंख्य समूहांना एकत्र पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी या काजवे महोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार. महाराष्ट्रातील राजमाची गाव, सिद्धगड वाडी, प्रबळमाची गाव, भंडारदरा, घाटघर, कोथळीगड, कोंढाणे लेणी आणि पुरुषवाडी यांसह अनेक ठिकाणी महिनाभर चालणाऱ्या या महोत्सवासाठी जुन महिना अखेरीस पर्यंत शिबिरे आयोजित केली जात आहेत. या ठिकाणी तुम्हाला काजव्यांचा हळूवार आणि तालबद्ध वावर पाहायला मिळते. हे काजवे पावसाळ्यापूर्वी लाखोंच्या संख्येने बाहेर पडू लागतात आणि याच काळात त्यांची संततीही वाढवतात. मानवी हस्तक्षेपामुळे खुप ठिकाणी काजव्यांची संख्या कमी होत आहे.
निसर्गामध्ये अनेक अन्नसाखळ्या कार्यरत असतात. यांमधील प्रत्येक जीव त्यामध्ये भक्ष, भक्षक, सफाई कर्मचारी, पुनर्वापर प्रतिनिधी, इ. रूपाने कार्यरत असतो. जंगल आणि जंगलाला लागून असलेल्या शेती क्षेत्रातील अन्नसाखळी मधील असाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे काजवे!
काजवे (Fireflies) हे विशिष्ट किटक या अन्नसाखळी मध्ये शेती आणि जंगलातील माश्या, मच्छर आणि इतर त्रासदायक कीटकांचे कर्दनकाळ आहेत. सोबतच कित्येक पक्षी आणि किटकभक्षी प्राणी उपजिविकेसाठी यांच्यावर आणि यांच्या अळ्यांवर अवलंबून असतात. अशाप्रकरे ते भक्षक आणि भक्ष अशा दोन्ही भूमिका पार पाडतात. विशेष म्हणजे मे महिना अखेरीस पाऊस सुरू व्हायच्या वेळेस त्यांच्या मिलन काळात नर काजवे मादी ला आकर्षित करण्यासाठी आणि इतर नरांसोबत संपर्क करण्यासाठी आपल्या शरीरातून प्रकाश निर्मिती करतात. त्यांचे लुकलुकणे हे प्रजातीनिहाय वेगवेगळे असते.


परंतु अलीकडे महाराष्ट्रातील राजमाची गाव, सिद्धगड वाडी, प्रबळमाची गाव, भंडारदरा, घाटघर, कोथळीगड, कोंढाणे लेणी आणि पुरुषवाडी यांसह अनेक ठिकाणी  सहल आयोजक, मतलबी निसर्गप्रेमी धंदेवाईक लोक या काजव्यांच्या मिलन काळातच काजवा महोत्सव आणि सहली आयोजन करत आहेत. ज्यामध्ये बेदकारपणे वन्यजीव अधिवासात रात्रीच्या वेळी घुसखोरी, प्रचंड प्रमाणात टॉर्चचा उजेड आणि आवाजाचा वापर करणे, दारू पिऊन धिंगाणा करणे, प्लास्टिक कचरा करणे, रस्ता सोडून खाली गवतात वाहने फिरविणे अश्या कृतींमधून निशाचर वन्य जीवांना त्रास होईल असे वर्तन करतातच, सोबतच टॉर्च चा प्रकाश आणि आवाजाला या काळात काजवे प्रचंड संवेदनशील असतात. अशा कृत्यामुळे लुकलुकत संवाद आणि संदेश देण्याच्या क्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. वर उडणारे काजवे पाहत फिरताना आणि गवतात वाहने फिरवताना उडू न शकणाऱ्या काजव्यांच्या माद्या चिरडल्या जातात ज्यामुळे मिलन होऊ शकत नाही! यामुळे स्थानिक पर्यावरण सुद्धा धोक्यात आले आहे या गोष्टींमुळे काही वर्षांपूर्वी निसर्गप्रेमींनी आणि शात्रज्ञांनी आवाज उठविल्याने त्यावेळी या गोष्टींना तात्पुरता आळा बसला होता, परंतु हे काजवा महोत्सव आणि पर्यटनाचे पेव यावेळी पुन्हा फुटले आहेत.
तरी कृपया नष्टप्राय प्रजाती असलेल्या काजव्यांना आणि त्यांवर अवलंबून असलेल्या अधिवासाला आणि अन्नसाखळीला वाचविण्यासाठी आपण कडक पावले उचलावीत आणि या सर्व प्रकारच्या काजवा महोत्सवावर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये बंदी करावी आणि त्याच्याशी निगडित पर्यटन कृत्यांवर बंदी करण्यात यावी. अशी मागणी करत अनेक सामाजिक संघटना, वन्यजीव संघटना, वन्यजीव प्रेमी, अभ्यासक, वन्यजीव तज्ज्ञ यांनी सोबत मिळून  सामोहिकपणे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच सर्व महाराष्ट्रातून वन्य जीव सामाजिक संस्था मार्फत निषेध व्यक्त करावा लागेल. व शासनाने लक्ष न दिल्यास  अन्यथा याकरिता वेळ पडल्यास न्यायालयीन लढा दिला जाईल असा इशारा सलग तीन  वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा करणारे व जेष्ठ वनस्पती तज्ञ  डॉ.मधुकर बाचुळकर यांनी दिला आहे.
दुसरी बाजू म्हणजे असेच काही  महोत्सव सामान्य माणसाला निसर्गाशी जोडण्याचे कऱ्य करतात या पासून तेथील स्थानिक लोकांना रोजगार मिळतो  त्यामुळे जर दुसरीकडे जर हे काजवे महोत्सव (Fireflies Festival) होतच असेल तर,संबंधी  बारीक सारीक नियम कार्यात आणणे गरजेचे आहेत.  तेथील जैव विविधतेला हानी न होता नियमावली लागू करुन सावधानता बाळगत, सुव्यवस्था , काटेकोर नियम पाळीत या वनखात्याने व पर्यटन खात्या कळून अंबलबजावणी होणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here