
चंद्रपूर : मोहम्मद सुलेमान बेग
जगप्रसिद्ध ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पामध्ये येणारे पर्यटक व्याघ्र दर्शन करण्यास फार उत्सुक असतो अशा वेळेस एखादी वेळा व्याघ्र दर्शन नाही झाले तर पर्यटक नाराज देखील होतात. येथे येणार पर्यटका मध्ये पक्षांविषयी आवड निर्माण व्हावी त्याकरिता हा एक नवा उपक्रम बर्डमॅन सुमेध वाघमारे पक्षीमित्र यांच्यासोबत ताडोबा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहेत.
बर्डमॅन सुमेधबौद्धी गंगाराम वाघमारे हा कलावंत,ता.जि.हिंगोली. येथील मध्यम परिवारातील रहिवासी असून त्यांना जंगलातील पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज काढण्याची कला अवगत आहे. कोणत्याही पक्ष्यांची आवाज शिकण्याची कला त्यांच्या मध्ये आहे.
ज्यामुळे ते सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करू शकतो.
ताडोबात येणारा पर्यटक इतर पक्षी प्राण्यांवर आवड निर्माण होईल. याकरिता पक्षी प्राणी व यांचे स्वभाव आणि त्यांच्या आवाजाचा जनजागृती कार्यक्रम आज दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी मोहर्ली येथील वन सभागृहात सायंकाळी 6.15 वाजता घेण्यात आले.
मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी (कोअर) ए. आर. गोंड यांच्याशी वन समाचार चे प्रतिनिधीनी संवाद साधल्यास त्यांनी सांगितले की “आम्ही पक्षी प्राणी व यांचे स्वभाव आणि त्यांच्या आवाजाचा जनजागृतीचे कार्यक्रम भविष्यात आगरझरी, कोलारा येथे देखील घेऊ जेणे करून ताडोबात येणाऱ्या पर्यटकांमध्ये पक्ष्यांविषयी आवड निर्माण होईल. त्यांना बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. पर्यटक व विद्यार्थी वर्गांना या कार्यक्रमाद्वारे बरेच काही शिकायला मिळेल. याची सुरुवात म्हणून आम्ही जनजागृती कार्यक्रम घेत आहो आणि या कार्यक्रमाची एक सुरुवात म्हणून मोहर्ली सभागृह मध्ये आंबेडकर कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले व त्यांनी या अनोख्या कार्यक्रमाचा आनंद घेतला व बरेच पक्ष्यांचा आवाज व त्यांच्या विषयी माहिती त्यांना मिळाली. जेणेकरून भविष्यात वन विभागात काम करण्याची आवड निर्माण होईल.
सदर कार्यक्रमास आंबेडकर कॉलेज चंद्रपूर चे मनोज वाजूरकर सर, लभाणे सर, चिमुरकर सर, विशाल शेंडे सर व विध्यार्थी, विध्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते व तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (कोअर) ए. आर. गोंड, क्षेत्र सहाय्यक व्ही. के. सोयाम, वनरक्षक पवन मंदुलवार, पवन देशमुख आदि उपस्थित होते.
