वाघाच्या शिकार प्रकरणातील चार आरोपींना पेंच मध्ये अटक

0
202

चंद्रपूर : (मोहम्मद सुलेमान बेग)

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात 12 जानेवारी 2023 रोजी वाघाच्या मृत्यूची घटना उधडकीस आली. पौवनी  बफर रेंज मधील सिल्लारी बीटच्या कम्पार्टमेंट क्र. 256 च्या संरक्षित जंगलातील कोडू तलावात मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खडबळ उडाली आहे. त्याच दिवशी सायंकाळी घोटी गावातून ३ गुन्हेगारांना पकडण्यात आले.
NTCA SOP च्या उपस्थितीत सकाळच्या सुमारास फील्ड डायरेक्टर ए. श्रीलक्ष्मी, डेप्युटी डायरेक्टर प्रभुनाथ शुक्ला,
ACF अतुल देवकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुजित कोलंगट आणि डॉ.सचिन कंबोज यांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
तसेच यावेळी सातपुडा फाउंडेशनचे बंडू उईके हे NTCA चे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते तर मुख्य वन्यजीव वॉर्डनचे प्रतिनिधित्व अजिंक्य भाटकर यांनी केले.

सदर घटनेतील आरोपींना अटक करून JMFC रामटेक येथे हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची वन कोठडी दिली आहे. सदर घटनेतील अटक आरोपींना JMFC रामटेक येथे हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची वन कोठडी देण्यात आले आहे.
NTCA चे प्रतिनिधी अजिंक्य भाटकर यांनी मुख्य वन्यजीव वॉर्डन, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले.
आज  दि. 13 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी उशिरा आणखी एका आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी आणि उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ACF अतुल देवकर आणि RFO जयेश तायडे यांच्या तर्फे पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here