सावली परिसरातील वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश

0
182

यश कायरकर  (जिल्हा प्रतिनिधी):सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या व्याहाड खुर्द उप वनक्षेत्रातील सामदा बिट अंतर्गत नहरा जवळ आज दि. ०४ जानेवारी २०२३ रोजी पहाटेच्या ५.३० वाजताच्या सुमारास कक्ष क्र. 502 मध्ये  वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

गेल्या 21 दिवसापासून निलसनी पेडगाव या परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यात  मानव हानी झालेली होती. त्यानंतर या परिसरात लोकांमध्ये निर्माण झालेले भीती व राजकीय दबावामुळे वन विभागाला या वाघाला तात्काळ जेरबंद करणे गरजेचे झाले होते. त्यानुसार वनविभागाने आपले संपूर्ण समूह तैनात करुन त्या भागात वाघाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले होते. शूटर आणि डॉक्टर हे सातत्याने वाघाकडे लक्ष ठेवून होते.
त्यानुसार आज  व्याहाड खुर्द उप वनक्षेत्रातील सामदा बिट अंतर्गत आज दि. ०४ जानेवारी २०२३ रोजी पहाटेच्या ५.३० वाजताच्या सुमारास कक्ष क्र. 502 मध्ये निदर्शनास येताच त्या वाघाला शूटर बी. एम. वनकर यांनी वाघाला ट्रांकुलाईज केले. त्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पि. एन. बशेट्टी यांनी तपासणी करून वाघाला पिंजऱ्यात टाकले.
सदर घटनेत जेरबंद करण्यात आलेला वाघ हा नर असून अंदाजे 4 ते 5 वर्षे वयाचा असल्याचे निदर्शनास आले आहे.
पुढील तपासणीकरिता ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले.
सावली वनपरिक्षेत्र अधिकारी पी. जी. विरुटकर, वनपाल कोडापे, वनपाल सूर्यवंशी, तसेच सावली वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वनरक्षक, सह आर. आर.यु. टिम चंद्रपूर,  या मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते.
वनविभागाने वाघ पकडल्याची माहिती मिळताच सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून. वाघ पकडल्याचा आनंद व्यक्त केले जात आहे.
तसेच परिसरातील लोकांनी सुटकेचा निःश्वास श्वास सोडला आहे.
“वाघाला जरी जेरबंद करण्यात आले असले तरी परिसरातील लोकांनी जंगल परिसरात व शेत जंगल परिसरातील शेतामध्ये वावरताना काळजी घेणे व सावधानता बाळगणे हे लोकांच्या सुरक्षेकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे.”  असे निवेदन सावलीचे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी लोकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here