नागभीड वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

0
218

यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी) : नागभिड वन परिक्षेत्र अंतर्गत, पहार्णी बिटातील इरव्हा येथील महीला नर्मदा भोयर (५०)  ही शेतामध्ये गवत कापायला गेली असताना अचानक वाघाने हमला केला त्यात ती जागेवरच मरण पावली.
सदर घटनां जवळील असलेला मुलगा आणि त्यांच्या सुनेने आरडा ओरडा केली असता वाघाने तिला सोडून जंगलाच्या दिशेने निघून गेला.

सदर घटना आज दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळच्या सुमारास गट क्र.१०८ मध्ये घडली आहे.
वनविभागाने परिवाराला 20000 रुपयाची तात्काळ मदत करून घटनास्थळी कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले व परिसरात वन विभागा द्वारे गस्त वाढवण्यात आली. तसेच परिसरातील लोकांना शेतावर सावध पणे जाण्याचा इशारा वन विभागाने केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here