यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी):
सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत सिंदेवाही शहरातील लोक सकाळी सिंदेवाही पाथरी रोडने मार्निंग वॉकला जात असतात. असेच नंदकिशोर शेंडे (५०) PWD कर्मचारी हे मार्निंग वॉकला जात असताना सकाळी ७.०० वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात काही अंतरावर असलेल्या अस्वल व अस्वलींच्या एक पिल्लांनी हमला करून त्यांना जखमी केले.
त्यावेळेस त्या रोडने मार्निंग वाकला जाणाऱ्या काही लोकांनी आरडा ओरडा करून अस्वल व तिच्या पिल्याना हाकलून लावले. त्यात नंदकिशोर हे जखमी झाले. त्यानंतर त्याची माहिती मिळतात सिंदेवाही वनविभागाचे कर्मचारी यांनी जख्मी नंदकिशोर ला सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यानंतर समोरील उपचाराकरिता त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.