
यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी): सावली तालुक्यातील रुद्रापूर येथील पहाटेला शौचालायास गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली.
सावली तालुक्यातील रुद्रापूर येथील बाबुराव बुधाजी कांबळे नामक व्यक्ती आज पहाटे शौचालायास गावाशेजारी जात अचानक पट्टेदार बाघाने हमला केला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुल आणि चार नातवंड असा आप्त परिवार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाचा हमला ही नित्याचीच बाब आहे. लोकांवर वाघ मोठ्या प्रमाणात हमले करत आहेत. असा एकही दिवस जात नाही की, वाघाने हमला केला नाही म्हणून, चंद्रपूर जिल्ह्यातील कुठे ना कुठे एकतरी घटना घडत असते. तरीही आणि “शासनाने घरोघरी सुलभ शौचालय निर्माण करून दिली आहे. मात्र त्या शौचालयाचा वापर न करता, परिसरात वाघ, अस्वल, रानटी डुकरे, बिबट्यांचा, या हिंस्त्र प्राण्यांचे वावर असताना सुद्धा जंगलालगत खुल्या जागेवर शौचास जाने हे स्वतः जिवावर उदार होऊन आत्महत्या करण्या सारखेच आहे.” त्यामुळे नागरिकांनी स्वतः ची काळजी घेणे आवश्यक आहे.
