आवळगाव परिसरात धुमाकूळ करणाऱ्या वाघाच्या बछड्याला जेरबंद करण्यात यश

0
521

यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी): ब्रम्हपुरी वनविभागातील दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत आवळगांव उपक्षेत्रातील शेतशिवार परिसरात घुमाकुळ घालत असलेल्या K-4 वाघास (नर) जेरबंद करण्याचे मा. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म. रा. नागपूर यांचे दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजीचे आदेश होते.
त्याअनुषंगाने दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत आवळगाव उपक्षेत्र / यांद्रा नियतक्षेत्रामध्ये (कक्ष क्र. 1047) डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकिय अधिकारी (वन्यजीव), RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांनी व अजय मराठे, सशस्त्र पोलीस यानी K-4 (नर) वाघास अचुक निशाना साधून सायंकाळी 6.45 वाजता डार्ट केला व सदर वाघ बेशुध्द झाल्यानंतर त्यास सायंकाळी 7.22 वाजता पिंज-यात सुखरूपरित्या बंदिस्त केले.
सदरची कार्यवाही श्री दिपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली श्री आर. डी. शेंडे, वनक्षेत्रपाल (प्रा) उत्तर ब्रम्हपुरी वनविभागाचे क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी, तसेच RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरचे सदस्य श्री बी. आर. दांडेकर, श्री ए. एन. मोहुर्ले, श्री एस. पी. नन्नावरे, श्री ए. डी. तिखट, श्री ए. डी. कोरपे, श्री ए. एम. दांडेकर, व श्री राकेश अहुजा ( फिल्ड बायोलॉजिस्ट, ब्रम्हपुरी) यांचे उपस्थितीत पार पडली.

जेरबंद करण्यात आलेल्या K-4 वाघाचे (नर) वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असून त्याला पुढील तपासणीकरिता ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here