घरटी- यांना हे कोणी शिकविले

0
458

देवेंद्र तेलकर (वन्यजीव अभ्यासक)

आपण पक्षांनचे लहान नाजूक व बारीक काड्या व गवताच्या पानाने बनविले सुंदर घरट्याच्या सहज मोहात पाडतो. पण  त्या खाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट अपण पहात नाही.

विणीचा हंगामा जसा सुरू होतो तसतसे पक्ष्यांमध्ये बदल घडताना दिसतात. खास करून नराचे बदल पटकन लक्षात येतात. जसेकाही ते नविन पिसांचा पेहराव करतात. कारण विणीच्या हंगामामध्ये मादी पेक्षा नरच सुंदर दिसतात कारण त्या काळात त्याचा पिसांवर एक चमक येते व तसेच बर्याच पिसांचे रंग बदलतात व नविन पिसांचा साज चडतो असे म्हणायला हरकत नाही. याच सुमारास नरांच्या आवाज मोकळे होउन त्यात अनेक स्वरांची भर पडते. नविन रंगाचे चमकदार पिसे फुलवुन व सुरात वेगवेगळे आवाज (गाणे) गावुन आपला रुबाब दाखवून हे मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. काही पक्षी तर मादीला तिच्या आवडत्या खाद्य, किडे व अळी भेट देवून वश करताना पाहीले.
या नंतर खरी परिक्षा सुरु होते. त्यात नर – मादी दोघे मिळून तर कधी नराला व मादी घर बांधण्याची सुरुवात करतात.
आपल्या कडे वेगवेगळ्या ऋतृत निरनिराळ्या जातीचे पक्षी निरनिराळ्या वेळी व आपापल्या पद्धतीने सभोवतालच्या परिस्थितीची व वातावरणाचा अंदाज घेऊन लागणारा अन्न पुरवठा परिपूर्ण राहिल या काळात घरटी बांधताना त्याला लागणारा वेळ व घरट्याचा लागणारे साहित्य गवत, काडी व कापुस व त्या सारख्या मऊ  उपदार वस्तू वापरून, तसेच जोराचा वारा व पाऊस पासून आणि इतरांन पासुन संरक्षण होईल व सहज कोणाच्या नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी नाजुक घरटी बांधतात त्यावेळी ते इतर काही अडचणी (हवा-पाणी) असल्यास त्याची पर्वा करत न करता सतत कार्य करत राहतात.
.. Eagle, Kit, Crow  सारखे मास भक्ष्यी हे झाडावर काड्या पासुन घरटी बनवितात.
..  Munia  सारख्या पक्षी गवतांच्या पानानी चेंडू सारखे व एकाबाजूला लहानसे प्रवेशद्वार ठेवून अंडी व पिलांंसाठी उबदार हवा व पाण्यात ओले राहणार याचा विचार करुन मुनिया झाडावर तर
.. Lark चंडोल जमिनीवर घरटी घरटी बनवितात.
.. Tailor bird, warbler, prinia, सारखे पक्षी सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेणारे सहज लक्षात येणार नाही आशा ठिकाणी लहान पाने एकमेकांना चिपकुन विणुन  घर बांधतात.
..  Robin, Bulbul, Sparrow यांची मानववस्तीत घराच्या कोपर्‍यात आडोश्याला पण घर बांधलेली दिसतात.
… Sunbird, Baya शिंजीर व सुगरणची घरटी लोंबकळणारी असतात. शिंजीर चे घरटेअगदी छोटे असून मजबूतीसाठी कोळीप्टकांचा वापर केलेला असतो. कोळ्याचे जाळे वाटावे असे. सुगरण पक्ष्याचे घरटे विहिरीवर, काटेरी झाडाच्या झुकलेल्या फांदीला विणलेले असते. घरटे मधेच फुगीर असून खाली निमुळते नळकांड्यासारखे प्रवेशद्वार .
..Woodpecker, Barbet  सुतार व ताबंट मजबूत चोचीने पोखरून झाडाची फांदी पोखरून त्यात घरटे बनवितात व अंडी देवुन संगोपन करताना.
..Owlet, Parakit, Myna, Hornbill
पोपट, घुबड, पिंगळा, दयाळ, धनेश, साळुंकी, रामगंगा सारखे उपरे पक्षी दुसऱ्यांनी पोखरलेल्या आयत्या ढोलीवर व तसेच झाडांमधील नैसर्गिक ढोल्यांचा ताबा हक्क दाखवून त्या दोलीचा वापर करताना,
.. Swift, Swallow धूसर मार्टिन  स्वालो   सारखे पक्षी हे घुमट, उंच कमान  व भिंतीवर   एखाद्या पुलाखाली व बाहेर डोकावणाऱ्या कड्यावरीर खडकाखाली एकटे किंवा एकमेकांना चिकटलेली व त्याला खाली किंवा बाजूस प्रवेशद्वार असलेली लहान माठांप्रमाणे चिखलाचे ओल्या माती पासुन व आतून गवत व मऊपिसे चिकटवून घर बनवतात
.. Partridge, Quail Lapwing तितर, टिटवी मोर सारखे जमिनीवर राहणारे पक्षी पायांनी  किंवा चोचीने माती उकरून केलेला छोटा खळगा करुन उघड्यावरच अंडी देतात व त्याच्या आजूबाजूला आडोश्याला मिळता जुळ्यात्या आकाराचे दोन चार दगड व मातीचे ढेकळं ठेवतात. मोर पण आपली अंडी यांच्या प्रमाणेच धुर्यावर व लहान झाडाच्या आडोशानी जमीनीवरच देतो.
.. Bee-eater Kingfisher  धीवर व राघू प्रजातीचे पक्षी भुसभुशीत मातीची जागा शोधून त्यांच्या चोचीने  एक मिटर आडवे  लांब बीळ खोदन त्यात अंडी देतात तर शत्रूंना मूर्ख बनविण्यासाठी आजूबाजूला अनेक खोटी बिले खोदुन ठेवतात.
…. Cormorant, Heron, Egrat सारखे पक्षी एकटे तर कधीकधी समूहाने पाण्याजवळ गवताळ झाडीत घरटे करतात
.. Jacana,Little grebe सारखे काहीपक्षी पाण्यातील पाणवनस्पती एकत्रित आणुन त्या पासुन पाण्यातचओबडधोबड घरटे बांधतात. कमळपक्ष्यी आगदी थोडे पान जमा करत त्यावर आपली अंडी घालतो पाणवनस्पती पासुन ओबडधोबड घरटे करतात.
घरटे बांधुन व अंडी उठविण्याचे त्या नंतर पिल्लांचे संगोपन व संवर्धन करत असताना घरट्याची साफसफाई पण वेळेवर नियमीत करत असतात हे सर्व यांना कोणी शिकविले.
ह्या सर्व गोष्टीचा विचार करुन आपणास विनंती करतो की कृपया कोणत्याही पक्षी घरटे बांधताना दिसल्यास व ज्या घरट्यात पक्ष्यांचा वावर आहे (अंडी व पिल्ले आहेत) त्याला व त्यांच्या घरट्याला कोणताही त्रास न देता त्यांना संरक्षण द्या.

देवेंद्र तेलकर (वन्यजीव अभ्यासक व पक्षीमित्र)

Hon. Wildlife Wardan Akola

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here