चंद्रपूर : चंद्रपुरात वाघाच्या संख्यात वाढ होत असल्याने मानव – वन्यजीव संघर्ष देखील वाढत आहे. चंद्रपुरात सतत एका मागे एक वाघांचे हल्ले होत असल्याचे आपण बघतच आहो. कधी शेतात तर कधी जंगलात वाघाच्या हल्ल्यात जीवित हानी होत असून मृत्यूची संख्या वाढतच आहे व तसेच वाघाच्या मृत्यु मध्ये देखील वाढ होत आहे.
NTCA च्या आकडेवारीनुसार 2022 च्या जुलैपर्यंत 27 वाघांचा मृत्यू झाले असल्याची नोंद आहेत.भविष्यात वाघाच्या हल्ल्यात जीवित हानी होऊ नये म्हणून चंद्रपुर चे वाघ दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरित करण्याचे NTCA ने नुकतीच परवानगी दिली असल्याचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 15 तारखेला वाघाला नवेगाव-नागझिरा जंगलात स्थलांतरित करण्यात येत आहे.