चंद्रपूर : जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (कोर) क्षेत्रातील पर्यटन आज दि.१ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू करण्यात आले ताडोबा पर्यटन मागील तीन महिन्यांच्या कालावधीनंतर ताडोबा (कोर) जंगलाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.
व्याघ्र दर्शनासाठी देश विदेशातून आलेले वन्यजीव प्रेमी आणि स्थानिक पर्यटकांची गर्दी मोठ्या संख्येत प्रवेश द्वार येथे दिसून आली. ताडोबात येणाऱ्या सर्व पर्यटकांचे वनविभागा तर्फे गुलाब देऊन स्वागत करण्यात आले व तसेच वन्यजीव सप्ताह निमित्त फ्रेंड्स ऑफ ताडोबा संस्था तर्फे पर्यटकांना वन्यजीव सप्ताह साजरा करण्यास फीडबॅक फॉर्म भरून देण्यास सांगितले.
सद्या सफारीचा वेळ सकाळ फेरी 6 ते 10 पर्यंत आणि दुपार फेरी 2.30 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत सफारी असणार आहे. तसेच ताडोबा मध्ये सिंगल युज प्लॅस्टिकवर बंदी व रिसॉर्ट्स मध्ये ही प्लॅस्टिकच्या बाटल्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी (कोर) गोंड, क्षेत्र सहाय्यक विलास सोयाम, वनरक्षक पवन मंदूलवार,पवन देशमुख, व्ही.यु.पवार, प्रियांका जावडेकर, स्नेहा महाजन, सुमीता मट्टामी तसेच मोहर्ली प्रवेश द्वार वरील पर्यटक मार्गदर्शक, जिप्सी चालक व मालक व रिसॉर्ट मालक संजय डीमोले, बंडू वेखंडे, होमस्टे मालक, स्थानिक ग्रामस्थ व मोहर्ली ग्रामपंचायत सरपंच सौ. सुनीता कातकर यांच्या हस्ते मोहर्ली प्रवेश द्वार वरील रिबीन कापण्यात आली व मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी (कोर) गोंड यांनी पर्यटकांच्या जिप्सींना हिरवी झंडी दाखवून पर्यटनास सुरुवात केली.
आदिवासी ग्राम विकास पर्यटक मार्गदर्शक समिती तर्फे ताडोबाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना सन्मानचिन्ह देण्यात आले व पर्यटकांना मिठाई देण्यात आली.