
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना आज दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सदर घटनेत मृतकाचे नाव धृपता श्रावण मोहुर्ले असे असून वय वर्षे 55 आहे.
ही महीला आपल्या शेतातील धान पिका मधिल निदंन काढीत असतांना शेतशिवारात अचानक पट्टेदार वाघाने हल्ला चढवून जागीच महीलेला ठार करून जंगलाच्या दिशेने काही अंतर ओढत नेल्याची घटना घडली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी येथील पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून मृतक महीलेचा पंचनामा करण्यात आला आहे.
या आधी सुद्धा अशा अनेक घटना आवळगाव येथे घडले असून गावातील जनतेमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.संबंधीत वनविभागाने वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
