गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरात मध्ये जाणार : सुधीर मुनगंटीवार

0
540

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार सिंहाची जोडी

उभय राज्यांत करार, केंद्राकडून मंजुरी मिळविणार

अहमदाबाद : गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यत बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी ) जुनागढ येथे पाठविण्यात येणार आसल्याची माहीती राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी  दिली. गुजरातचे वन राज्य मंत्री  जगदीश विश्वकर्मा वनमंत्री ना.  सुधीर मुनगंटीवार यांच्यात सोमवार, 26 सप्टेंबर 2022 रोजी अहमदाबाद येथे चर्चा झाली.

सदर प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली कडून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव ) सुनील लिमये व जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती.
4 एप्रिल 2022 रोजी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली चे संचालक जी मल्लिकर्जुन यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक  सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरात चे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली व कार्यवाही सुरू केली होती.

त्यावर ना  सुधीर मुनगंटीवार आणि गुजरात चे राज्यमंत्री  विश्वकर्मा यांनी सोमवारी 26 सप्टेंबर ला विस्तृत चर्चा केली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here