ऊसेगांव येथे वाघाच्या हल्यात एक इसम ठार

0
983

वन विभागाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून जंगलात जाने जिवावर बेतले

यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी);
देसाईगंज वन विभागाच्या अंतर्गत उसेगाव या गाव जवळील देसाईगंज वन विभागाच्या जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दि. ८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली असून वाघाच्या हल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव प्रेमपाल तुकाराम प्रधान वय ४५ वर्ष असून ऊसेगाव येथील रहिवासी आहे.
ऊसेगाव या गावात गणेश मंडळाच्या पंडाल मध्ये लावलेल्या माईक वरून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातील लोकांना जंगलात जाऊ नये,  असे मागील दोन-तीन दिवसापासून त्या जंगल परिसरात मध्ये वाघाला फिरतांना बघितले होते, अशी मुनादी सकाळी ७.०० वाजताच्या सुमारास देण्यात आली होती, तरी सुद्धा मृतकाने ही मुनादी आपल्या कानाने ऐकून सुद्धा घरातील काड्या आणि झाडणी बनवण्याच्या मोहापायी जंगलामध्ये जाताच वाघाने अचानकपणे झडप घालून त्याला जागीच ठार केले.
शुल्लक कामाकरिता जंगलात जाण्याचा उत्साह लोकांनी न सोडल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे.
जंगलात जाणाऱ्या लोकांना अनेक माध्यमांद्वारे वारंवार ताकीद देऊन वन विभागाचे कर्मचारी दिवस रात्र शोध मोहीम राबवून वाघाच्या हल्ल्यातून लोकांचे कसे रक्षण करता येईल यासाठी उपाय योजना करीत आहेत. तरीही लोकांकडून मुद्दामपणे वन विभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे वन विभागासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
सकाळच्या सुमारास उसेगावात वाघाच्या हल्ल्याची माहिती मिळताच वन विभागाची
यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा ही घटनास्थळी पोहोचलेली होती घटनास्थळ पंचनामा करून
मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे.
या वाघाच्या हल्यामुळे उसेगाव परिसरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरलेली. मात्र परिसरातील जनतेने त्यानंतर परत असे हमले होऊन कुणाचे जीव जाऊ नये म्हणून गांभीर्याने विचार करून आमच्या सूचनेचे पालन करावे असे वन विभागाने लोकांना आग्रह केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here