भंडारा जिल्ह्यातील सारस पक्षी संवर्धनाकरिता तयार होणार आराखडा

0
393

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सारस पक्ष्यांचे धोक्यात आलेले अस्तित्व लक्षात घेऊन मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या Sou Motu Public Interest Litigation (PIL) No. 02/2021 मधील आदेशानुसार भंडारा जिल्ह्यातील सारस पक्षी संवर्धनासाठी सारस पक्षी संवर्धन आराखडा तयार करावयचा आहे. त्याकरिता जिल्हाधिकारी भंडारा यांच्या अध्यक्षेत समिती गठीत करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सारस पक्षाचे आधीवास सुरक्षित करून त्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने सारस संवर्धन आराखडा तयार करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी भंडारा यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.  त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा सारस संवर्धन समितीच्या सदस्यांनी तुमसर तालुक्यातील सारस पक्षांचे अधिवास असलेल्या  मौजा उमरवाडा, वाहिनी, बिनाकी या गावांना भेट देवून सारस पक्षी संवर्धनाबाबत स्थानीक गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच स्थानिक माहितीच्या आधारे सारस पक्ष्यांचे वास्तव्य असलेल्या अधिवास क्षेत्रांना समितीद्वारा भेट देऊन सारस पक्षाच्या अधिवास विकासाच्या दृष्टीने सविस्तर क्षेत्र पाहणी करण्यात आली.

महाराष्ट्रात सारस पक्षी फक्त भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आहेत. सारस पक्ष्यांचे आधीवास दिवसेंदिवस नष्ट होत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.  चालू वर्षी केलेल्या सारस पक्षी गणनेनुसार भंडारा जिल्ह्यात फक्त 3 सारस आहेत.
सदर पक्षी महाराष्ट्रातून नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.
सदर क्षेत्र भेटीत जिल्हा सारस संवर्धन समितीचे सदस्य राहुल गवई उपवनसरंक्षक भंडारा, अरुण बलसाने जिल्हा कृषी अधिकारी, सावन बाहेकर सेवा संस्था गोंदिया, शाहिद खान मानद वन्यजीव रक्षक भंडारा तसेच शैलेश कुमार कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, किशोर भोयर कार्यकारी अभियंता विद्युत पारेषण विभाग, बाबासाहेब टेले तहसीलदार तुमसर, संजय दलाल पाटबंधारे विभाग तुमसर, श्री प्रदीप म्हसकर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नंदागवळी खंड विकास अधिकारी तुमसर,  रहांगडाले वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर, व तुमसर येथील वन कर्मचारी व सारस मित्र उपस्थित होते. क्षेत्रभेटीतील निरीक्षणांचा समावेश सारस संवर्धन आराखड्यात करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी सदरची क्षेत्रभेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here