
चंद्रपूर : दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील लवकरच आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पाचे आगमन होत आहे बऱ्याच घरी सजावट देखील सुरू होत आहे. बऱ्याच घरांमध्ये सजावटी करिता मोरांच्या पिसा चा उपयोग करतात व त्याला शुभ मानतात. त्याकरिता आपण बाजारात मोर पंखाची सर्रास खरेदी करतो पण आपण कधी विचार करत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मोरपंख बाजारात येतात तरी कसे.
दुकानदार म्हणतात मोरांचे गळलेले पंख बाजारात विकायला येतात. आपल्यापैकी बरेच लोक जंगल भ्रमतीसाठी जातात पण आपल्याला कधीच कुठे पडलेले मोरांचे पंख दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात पंखाचे गवळणे शक्य नाही.
दर वर्षी मान्सूनच्या वेळेस ऑगस्ट महिन्यात मोराची पिसे पडण्यास सुरुवात होतात व गरमीच्या सुरुवातीला त्याना नवीन पंख येण्यास सुरुवात होते. अशा वेळेस वर्षभर बाजारात मोरपंख उपलब्ध राहणे शक्य नाही. तर मग मोरपंखासाठी मोरांची कत्तल करून उपसून बाजारात विकण्यास येण्याची शक्यता आहे. असे जर असेल तर कत्तल झालेल्या मोराचे मोरपंख गणपतीच्या सजावटीत वापरणे योग्य आहे का ? अशा मोरपंख सजावट करून गणपती बाप्पा खुश होणार का ? यात आपण गणपती बापाला खुश न करता दुखी करत आहोत.
तसेच दरवर्षी मोहरम मध्ये सवारीच्या सजावट करिता मोरपंखचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे ते सुद्धा टाळले पाहिजे. कोणत्याही धर्माचा सण असो सर्व जनतेने मोरपंख खरेदी करणे टाळावे.
तसेच बरेच मोर पक्षी अंधश्रद्धेच्या बळी होताना आपण बघतो. उदाहरण मोरपंख पिसांचा गुलदस्ता घरी प्रत्येकाला दिसेल अशा ठिकाणी ठेवतात ज्यामुळे घरात सकारात्मकता राहते. तर काही असे म्हणतात घराच्या पूर्व दिशेला मोराची पिसे ठेवणे शुभ असते. तर काही असे म्हणतात बेडरूम मध्येही मोराची पिसे ठेवावीत यामुळे वैवाहिक जीवनात सुख-शांती राहते सुखाचे आगमन होते व धन प्राप्त होते.
अशा अनेक गोष्टी समोर येतात.
एकीकडे आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे व गणपतीचे बंधू कार्तिक देवांचे वाहन मोर आहे. तेव्हा आपण आपल्या मोराचे प्राण वाचवणे सगळ्यांचे कर्तव्य आहे त्याकरिता आपण सर्वांनी मोरपंख खरेदी करणे टाळावे जेणेकरून भविष्यात मोरांची कत्तल टाळण्यास मदत होईल.
