
यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी) ; आज दि. १८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील मानव वन्यजीव संघर्षातील कारणीभूत वाघाच्या बछड्याला (Sub Adult Male) सुखरूप जोरबंद करण्यात आले.
प्राप्तमाहितीनुसार वाघाचा बछडा हा अंदाजे 16 ते 18 महिन्याच्या जवळपास असून सायगाटा परिसरात व उत्तर ब्रह्मपुरी,व नागभीड वन परिसरात सध्या च्या स्थितीत घडलेल्या घटनाकारणीभूत असल्याचे लावलेल्या ट्रॅक कॅमेऱ्यावरून निदर्शनास आले होते. त्यानुसार आज सापडा रचून त्याला बेहोश करून पकडण्यात आले. त्याला ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले असून त्याला गोरेवाडा प्राणी संग्रहालयात देण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे. त्या वाघाच्या छावकाच्या जोरबंद करण्यात आल्यामुळे या परिसरातील मानव वन्यजीव संघर्ष थोडा विराम नक्कीच मिळेल व वन विभागाच्या या तात्काळ करण्यात आलेल्या रेस्क्यू मुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये आनंदच निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कारवाईचा परिसरात कौतुक केल्या जात आहे.
या अभियानात जलद बचाव गट ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरचे डॉ.रविकांत शामराव खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) अजय चुडामण मराठे, सशस्त्र पोलीस (शूटर), अतुल एन.मोहुर्ले, भोजराज आर.दांडेकर, सुनील पी.नन्नावरे,अमोल डी.तिखट अमोल डी.कोरप, वाहन चालक अक्षय एम.दांडेकर वाहन चालक, तसेच ब्रम्हपुरी वनविभागाचे आर. शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, राकेश अहुजा वन्यजीव अभ्यासक, ब्रम्हपुरी वनविभागाचे कर्मचारी. यांचे सहकार्य लाभले.
