
चंद्रपूर : चंद्रपूर वनवृत्त व वन्यजीव विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी वन्यजीव व वन संरक्षणाचे सन्माननीय कार्य केल्याबद्दल दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी पोलीस ग्राउंड चंद्रपूर येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा निमित्त मान. नामदार सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने महाराष्ट्र शासन यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले.
सदर कार्यक्रमात राहुल अनंतराव कारेकर, वनक्षेत्रपाल, एम.पी. तावडे क्षेत्र सहायक, दुर्गापुर, डी. बी. दहेगावकर नियतक्षेत्र वनरक्षक दुर्गापुर, यांना चंद्रपूर परिक्षेत्रातील दुर्गापूर उपक्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता जनगावाच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व प्रभावी उपाययोजना करून मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत केली व बिबट्याला ठार मारण्याचे आदेश असतानां देखील त्याला जिवंत जेरबंद करण्यास यश मिळाले व तसेच वन्य प्राण्यांचे व गावकऱ्यांचे प्राण वाचविण्यास योग्य नियोजन करून त्यांचे प्राण वाचविले.
ए.एस. पठाण नियतक्षेत्र वनसंरक्षक बाबूपेठ यांनी 2021-2022 व 2022-23 मध्ये कक्ष क्र. 443 मधील बाबुपेठ मधील अतिक्रमण हटवून अतिक्रमण निर्मूलनाचे उत्कृष्ट कार्य केले.
डी.बी. चांभारे क्षेत्र सहाय्यक टेंभुर्डा, एस. व्ही. वेदांती वनरक्षक, आय.डब्ल्यू. लडके वनरक्षक, डॉ. आनंद नेवारे पशुवैद्यकीय अधिकारी वरोरा यांनी संरक्षणाचे उत्कृष्ट कामे केली.
नंदकिशोर वासुदेव पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर, सुभाष दयानंद मरसकोल्हे वनरक्षक यांनी मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली व वन्यजीव व वनसंरक्षणाचे उत्कृष्ट कार्य केले.
डॉ. रविकांत शामरावजी खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) हे एकमेव प्रथम वन्यजीव चिकित्सक असून त्यांना जागतिक स्तराचे सेंचुरी अवार्ड बहाल करण्यात आले आहे.
मागील काही महिन्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला असता नरभक्षी ठरलेला एका वाघास व तीन बिबट्या तसेच (डब्ल्यू सी एल) परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला असता नरभक्षी वाघास व तीन बिबट्यास व एका मादी बिबट्यास ठार मारण्याचे वन विभागास ऑर्डर प्राप्त झाले असताना देखील डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी विशेष कौशल्य, धैर्य वापरून त्यांच्या चमू सह सदर नरभक्षी ठरलेल्या एका वाघास व तीन बिबट्यास यशस्वीपणे बेहोशीचे इंजेक्शन देऊन जिवंत जेरबंद केले. ज्यामुळे परिसरातील अनेक गावकऱ्यांचे प्राण वाचले व तसेच या कार्यास सहकार्य करणारे अजय चुडामल मराठे सशस्त्र पोलीस, जलद बचाव गट सदस्य अतुल एन. मोहूर्ले, भोजराज आर. दांडेकर, सुनील पी. नन्नावरे, अमोल डी. तिखट, पवन एम. कुळमेथे, अमोल डी. कोरपे, अक्षय एम. दांडेकर यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, माजी महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
