मुल: मुल तालुक्यातील टेकाडी येथे वाघाने एक गुरख्याला किळकोळ जखमी केल्याची घटना आज दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे.
सदर घटनेत जखमी झालेल्या गुरख्याचे नाव विश्वेश्वर पेंदाम असे आहे प्राप्त माहितीनुसार गुराखी हा टेकडी येथील जंगलात गुरे चरायला नेले असता अचानक त्याच्यावर वाघाने हल्ला करून किरकोळ जखमी केले आहे. ही घटना सावली रेंज येथील टेकाडी बिटातील आहे.
सदर घटनेची माहिती गावात होताच गावकऱ्यांनी लगेच वनविभागाला कळविले.माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक शेंडे व वन्यजीव प्रेमी उमेशसिंग जिरे घटना स्थळी दाखल झाले व लगेच जखमी गुराखीला मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले व उपचार करून घरी पाठविण्यात आले. पुढील तपास वन विभाग करीत आहे.