यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी):
नागभीड तालुक्यातील पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असलेले घोडाझरी तलाव आज पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. दोन दिवसापासून सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे घोडाझरीचा सांडवा हा धोकादायक स्थितीत प्रवाहीत होत असून त्या तलावापर्यंत जाण्याकरिता असलेले रस्ते सुद्धा पुरामुळे बंद झालेले आहेत. त्यामुळे दोन ते तीन दिवस घोडाझरी तलाव पर्यटनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
घोडाझरी ओव्हर फ्लो च्या सुरुवातीला पहिल्या रविवारची पर्यटकांची अथांग गर्दी, त्यातही पर्यटकांद्वारे घातल्या जाणार आहे हैदोस, मारामार्या, यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने व महिला पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाने दर रविवारला घोडाझरी पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र यामुळे पर्यटकांमध्ये निराशा होऊन, घोडाझरी सलग सुरू ठेवण्यात यावा याकरिता नागभीड वन विभागाकडे पर्यटक आणि स्थानिक पत्रकारांद्वारे वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे रविवारला पर्यटन सुरू ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. मात्र सततच्या दोन दिवस पडणाऱ्या संततधार पावसाने आज दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी तो निर्णय मोडकळीस काढला व घोडाझरी पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
“सततच्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घोडाझरी तलावाकडे जाणारे जंगलातील रस्ते बंद झालेले आहेत, आणि तलावातील सांडव्याचे प्रवाह सुद्धा धोकादायक स्थितीत वाहत असून जीवित हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोडाझरी तलाव पर्यटनाकरिता आज बंद ठेवण्याचे निर्णय पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच घेण्यात आलेले आहे.” – एच.बी.हजारे, वनपरिक्षेत्र अधिकारी नागभीड.
“परिसरात अतिवृष्टीमुळे पावसाचे रेड अलर्ट घोषित करण्यात आले असून , कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने एखाद्या दिवशी पर्यटन बंद ठेवायला हरकत नाही. संबंधित विभागाने या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजे. संपूर्ण पोलीस विभाग बंदोबस्तात असतोच त्यामुळे १५ ऑगस्ट ला सुद्धा बंद ठेवायला हरकत नाही” – वैभव बी. कोरवते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नागभीड.