चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या चिमूर तालुक्यातील खडसंगी बफर झोन वनपरिक्षेत्रातील अलिझंझा येथील किटाळी गावालगत असलेल्या हेटी शेत शिवार परिसरात स्वतःचे बैल चारत असतांना अचानक वाघाने हल्ला करून शेतकऱ्याला जागीच ठार केले व त्या सोबत बैलावरही हल्ला करून ठार केले व दुसरा बैल जखमी झाले असल्याची घटना आज दि. 15 जुलै 2022 रोजी सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सदर घटनेत मृतकाचे नाव सीताराम नन्नावरे वय ६५ वर्ष असून अलिझंझा येथील रहिवासी आहे.
सदर घटनेची माहिती इतर शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली व माहिती मिळतात कोलारा (कोअर) झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, खडसंगी (बफर) झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे पथका सोबत घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उप जिला रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले आहे.
सदर घटनेची तपासणी सुरू असून.परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.