
चंद्रपूर : जिल्ह्यातील नागभीड ब्रम्हपुरी महामार्गावर वाघांचे रोड क्रॉस करतांना व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल झाल्याने उघडकीस आली.
सदर घटना ही दि. ०६ जुलै २०२२ रोजी सायंकाळी मार्गावरील तुमडी मेंढा गावाजवळची सायगाटा परिसरातील आहे.
सदर परिसरात वाघ रस्ता ओलांडतानां या मार्गाने जाणाऱ्या वाहन धारकांनी वाहन थांबवून वाघाचे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये ठिपले व सोशल मिडियावर वायरल झाले आहे. थोड्या वेळा करिता का होई ना पण मार्गावरील रहदारी थांबवून व्याघ्र दर्शनाचा आनंद घेतला.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच परिसरात शौचास बसलेल्या एका व्यक्तीला वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे या परिसरात वाघ असल्याची लोकांना पूर्णपणे माहिती असूनही या परिसरात वाहनं भरधाव वेगानेच चालतांना दिसतात.
या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा वावर व भ्रमण मार्ग असल्याने या भागातून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर नेहमीच रस्ता ओलांडताना आढळून येतात, नेहमीच या रस्त्यावर मानव – वन्यजीव अपघाताच्या घटना घडतात. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा जाडीचे कुंपण व या ठिकाणी उड्डाणपूल होणे अत्यंत आवश्यक आहे.” परिसरातील वन्यजीव प्रेमी व ‘स्वाब’ संस्थेचे सह सचिव हितेश मुंगमोडे यांनी वन समाचार च्या प्रतिनिधी ही संवाद साधल्यास आपले मत व्यक्त केले. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी यावर विचार करण्याची गरज आहे.
