भारतात एकूण 106 राष्ट्रीय उद्याने आहेत ज्यांचे क्षेत्रफळ 44,372.42 किमी 2 आहे, जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 1.35% आहे. त्यापैकी भारतातील बहुतेक राष्ट्रीय उद्याने दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यात चार ते पाच महिने बंद असतात. काही उद्याने तर आधीच बंद होतात तर काही पावसाळ्यात बंद होतात.
देशाच्या काही भागात सर्वात जास्त पाऊस पडतो आणि काही उद्यानांमध्ये दरवर्षी पूर देखील येतो. देशाच्या इतर भागांमध्ये पूर स्थिती नसली तरीही, पावसाळ्यात जंगलांमध्ये पाणी साचते आणि वाहनांच्या आवा जावीवर अडथळा निर्माण होतो अशा वेळेस कच्चे रस्ते खराब होतात त्यामुळे पावसाळ्यात राष्ट्रीय उद्याने बंद ठेवण्यात येते. असे ही मानले जाते की या काळात वाघ प्रजनन प्रक्रियेवर असतो त्यामुळे राष्ट्रीय उद्यान बंद केले जाते. देशातील बहुतांश कोर क्षेत्रातील पर्यटन बंद असते.
व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा 30 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार आहे. मात्र, येथील बफर क्षेत्र वर्षभर उघडे राहतात. पावसाळ्यात हिरव्यागार जंगलाचा आनंद व पक्षी निरीक्षण करण्यास ताडोबा बफर हे एक चांगले ठिकाण आहे. असेच बरेच राष्ट्रीय उद्याने आहे जे वन्यप्राण्यांसाठी लोकप्रिय आहे.